"आमच्या नादाला लागू नका!" इस्रायलनं पाकड्यांचा फाडला बुरखा, ख्वाजा आसिफ यांची बोलतीच केली बंद; जागतिक राजकारणात खळबळ

Israel Slams Pakistan Defense Minister Khawaja Asif: इराण आणि अमेरिका यांच्यातील तणाव निवळण्यासाठी तात्पुरता युद्धविराम घडवून आणण्याच्या प्रक्रियेत पाकिस्तान सध्या मध्यस्थीची भूमिका बजावत आहे.
Pakistan's Khawaja Asif Calls Israel Evil
Israel Slams Pakistan Defense Minister Khawaja AsifDainik Gomantak
Published on
Updated on

Israel Slams Pakistan Defense Minister Khawaja Asif: इराण आणि अमेरिका यांच्यातील तणाव निवळण्यासाठी तात्पुरता युद्धविराम घडवून आणण्याच्या प्रक्रियेत पाकिस्तान सध्या मध्यस्थीची भूमिका बजावत आहे. मात्र, ही शांतता चर्चा प्रत्यक्षात येण्यापूर्वीच पाकिस्तानच्या संरक्षण मंत्र्यांनी केलेल्या एका अत्यंत प्रक्षोभक आणि विवादित विधानामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर मोठा गदारोळ निर्माण झाला. पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांनी इस्रायलच्या विनाशाचे आवाहन केल्याने इस्रायलने यावर तीव्र आक्षेप नोंदवला असून पाकिस्तानसारखा देश 'निष्पक्ष मध्यस्थ' कसा असू शकतो, असा सवाल उपस्थित केला.

इस्रायली पंतप्रधान कार्यालयाने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'X' वर अधिकृत पोस्ट करत ख्वाजा आसिफ यांच्या विधानाचा कडक शब्दांत निषेध केला. इस्रायलने म्हटले की, "पाकिस्तानच्या संरक्षण मंत्र्यांनी इस्रायलच्या विनाशाचे आवाहन करणे हे अत्यंत आक्षेपार्ह आणि संतापजनक आहे. शांततेसाठी मध्यस्थ असल्याचा दावा करणाऱ्या सरकारकडून अशा प्रकारचे विधान कोणत्याही परिस्थितीत सहन केले जाऊ शकत नाही." ख्वाजा आसिफ यांनी आपल्या पोस्टमध्ये इस्रायलला मानवतेसाठी शाप म्हटले असून युरोपीय ज्यूंपासून मुक्तता मिळवण्याचे प्रक्षोभक आवाहन केले होते. त्यांच्या या विधानामुळे शांतता चर्चेच्या प्रक्रियेला मोठा धक्का बसण्याची शक्यता निर्माण झाली.

Pakistan's Khawaja Asif Calls Israel Evil
Iran US War Ceasefire: "इराणमध्ये सत्तापालट होणार!" ट्रम्प यांचा मोठा दावा; शस्त्रसंधीनंतर अमेरिकेची अण्वस्त्र तळांवर नजर

खरं तर, अमेरिका (America) आणि इराण यांच्यातील दोन आठवड्यांच्या तात्पुरत्या युद्धविरामासाठी पाकिस्तान मध्यस्थी करत असून 11 एप्रिल रोजी इस्लामाबादमध्ये या संदर्भात शांतता चर्चेचे आयोजन करण्यात आले आहे. या निमित्ताने पाकिस्तानची जागतिक स्तरावर चर्चा होत असतानाच आसिफ यांनी हे वादग्रस्त विधान केले.

त्यांनी असा दावा केला की, एकीकडे इस्लामाबादमध्ये शांततेची भाषा सुरु आहे, तर दुसरीकडे लेबनानमध्ये नरसंहार सुरु आहे. "इस्रायलकडून निर्दोष नागरिकांची हत्या केली जात आहे; आधी गाझा, मग इराण आणि आता लेबनानमध्ये रक्तपात सुरु आहे. ज्यांनी युरोपीय ज्यूंपासून सुटका मिळवण्यासाठी पॅलेस्टिनी भूमीवर या कॅन्सरसारख्या राज्याची स्थापना केली, ते नरकात जळतील अशी मी प्रार्थना करतो," अशा जहाल शब्दांत आसिफ यांनी टीका केली होती.

Pakistan's Khawaja Asif Calls Israel Evil
US Iran War Timeline: सुप्रीम लीडरचा अंत, 4000 मृत्यू अन् 90 हजार घरांची राखरांगोळी! अमेरिका-इराण युद्धाच्या टाइमलाइनचा थरारक पट; 40 दिवसांनी रक्तरंजित संघर्षाला ब्रेक

इस्रायलचे परराष्ट्र मंत्री गिदोन सार यांनी देखील यावर तीव्र प्रतिक्रिया दिली. त्यांनी म्हटले की, मध्यस्थीचा दावा करणाऱ्या देशाच्या मंत्र्याकडून उघडपणे ज्यू-विरोधी आणि द्वेषपूर्ण वक्तव्ये करणे हे अत्यंत गंभीर आहे. आसिफ यांच्या या भूमिकेमुळे पाकिस्तानची विश्वासार्हता आता जागतिक समुदायासमोर धोक्यात आली आहे. एकीकडे शांततेसाठी पावले उचलण्याचे नाटक करणे आणि दुसरीकडे एका देशाच्या अस्तित्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित करुन द्वेष पसरवणे, या पाकिस्तानच्या (Pakistan) दुटप्पी धोरणामुळे अमेरिका आणि इराणमधील संभाव्य युद्धविराम चर्चेवर आता संशयाचे मळभ दाटले आहे. या वादामुळे शांतता चर्चेच्या यशाबाबत आता आंतरराष्ट्रीय तज्ज्ञांकडून साशंकता व्यक्त केली जात आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com