इस्रायलमध्ये गेल्या चार वर्षांपेक्षा कमी कालावधीत सार्वत्रिक निवडणुका होणार आहेत. इस्रायलची संसद बरखास्त करण्यात आली असून नोव्हेंबरमध्ये सार्वत्रिक निवडणुका घेण्याच्या प्रस्तावाला मंजूरी देण्यात आली आहे. देशाच्या संसदेने या संदर्भात निर्णय घेतला असून विशेष विधेयक मंजूर करुन नव्या निवडणुकांचा मार्ग मोकळा केला आहे. पुन्हा नव्याने निवडणुका घेण्यास सर्वच पक्षांनी पाठिंबा दिला आहे.
खरंतर, इस्रायलचे (Israel) परराष्ट्र मंत्री यायर लापेड (Yair Laped) हे सरकार स्थापनेत महत्त्वाची भूमिका बजावणार आहेत. शुक्रवारी मध्यरात्रीनंतर लापेड देशाचे काळजीवाहू पंतप्रधान बनतील. हे पद भूषवणारे ते 14 वे व्यक्ती असतील. पंतप्रधान नफ्ताली बेनेट यांचे सरकार स्थापन होऊन अवघ्या वर्षभरातच पडले.
दरम्यान, इस्रायलमध्ये आता 1 नोव्हेंबर रोजी नव्याने निवडणुका होणार आहेत. 2019 ते 2022 मधील ही पाचवी निवडणूक असेल. नफ्ताली बेनेट (Naftali Bennett) सरकारमध्ये क्रमांक दोनवर असलेले यायर लापेड यांना काळजीवाहू सरकारची जबाबदारी देण्यात आली आहे. माजी पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यायर लापेड यांचा पाठिंबा घेऊन पुन्हा पंतप्रधान होऊ शकतात, असे मानले जात होते. मात्र, नंतर नव्याने निवडणुका घेणे योग्य ठरेल, असा निर्धारही त्यांनी केला.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.