Israel Attack: सीरियातील अलेप्पोमध्ये इस्रायलचा हवाई हल्ला, हिजबुल्लाच्या ठिकाणांना केले लक्ष्य; 38 जण ठार

Israel Attack: इस्त्रायल आणि हमास यांच्यात सुरु असलेलं युद्ध थांबण्याचं नाव घेत नाहीये. इस्त्रायल सातत्याने गाझावर हल्ले करत आहे.
Israel Attack
Israel AttackDainik Gomantak

Israel Attack: इस्त्रायल आणि हमास यांच्यात सुरु असलेलं युद्ध थांबण्याचं नाव घेत नाहीये. इस्त्रायल सातत्याने गाझावर हल्ले करत आहे. यातच आता, इस्रायली लष्कराने सीरियामध्ये मोठा हवाई हल्ला केला आहे. सीरियाने सांगितले की, अलेप्पोच्या उत्तरेकडील उसेक शहराजवळ शुक्रवारी पहाटे इस्रायली हवाई हल्ल्यात 38 लोक ठार झाले आणि अनेकजण जखमी झाले. ठार झालेल्यांमध्ये हिजबुल्लाच्या पाच दहशतवाद्यांचाही समावेश आहे. या हल्ल्यात मालमत्तेचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. सीरियन माध्यमांनी एका लष्करी अधिकाऱ्याच्या हवाल्याने सांगितले की, अलेप्पो आणि त्याच्या उपनगरातील नागरी ठिकाणांवर इस्रायलने हल्ले केले. प्रत्युत्तरात सीरियन बंडखोर गटानेही इस्त्रायलवर ड्रोन हल्ला केला.

सीरियन ऑब्झर्व्हेटरी फॉर ह्यूमन राइट्सने सांगितले की, इस्रायली हल्ल्यांनी लेबनीज दहशतवादी संघटना हिजबुल्लाच्या क्षेपणास्त्र डेपोला लक्ष्य केले. या हल्ल्यांमध्ये डझनभर सैनिक मारले गेले. हल्ल्याच्या दोन तासांनंतरही स्फोटांचे आवाज ऐकू येत होते. दुसरीकडे मात्र, या हल्ल्यांबाबत इस्रायली अधिकाऱ्यांकडून तात्काळ कोणतेही वक्तव्य आलेले नाही.

Israel Attack
Hezbollah Attack On Israel: हिजबुल्लाचा इस्त्रायलवर मोठा हल्ला, काही मिनिटांत डागली 37 रॉकेट; ''निष्पाप पॅलेस्टिनींच्या मृत्यूचा हा बदला...''

इस्रायल सातत्याने सीरियन ठिकाणांवर हल्ले करत आहे

दरम्यान, हमासबरोबर संघर्ष सुरु झाल्यापासून इस्रायल सातत्याने सीरियातील इराणशी संबंधित ठिकाणांवर हल्ले करत आहे. गुरुवारी, सीरियाच्या माध्यमांनी राजधानी दमास्कसजवळ हवाई हल्ल्याचे वृत्त दिले, त्यात दोन नागरिक जखमी झाले. सीरियामध्ये हिजबुल्ला या दहशतवादी संघटनेचा तळ आहे. देशातील चालू असलेल्या संघर्षात सरकारी सैन्याची बाजू हिजबुल्ला घेत आहे. अलेप्पो हे सीरियाचे सर्वात मोठे शहर आहे, जे एकेकाळी त्याचे व्यापारी केंद्र होते. यापूर्वी, या शहराने अशाप्रकारच्या मोठ्या हल्ल्यांचा सामना केला आहे, ज्यामुळे आंतरराष्ट्रीय विमानतळ बंद करावे लागले होते. मात्र, शुक्रवारच्या हल्ल्याचा विमानतळावर कोणताही परिणाम झाला नाही. गाझामध्ये हमासबरोबर तर सीरियामध्ये हिजबुल्लाबरोबर गेल्या पाच महिन्यांपासून इस्त्रायल दोन हात करत आहे. या पार्श्वभूमीवर सीरियात हल्ले वाढले आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com