इस्रायलने घेतली जगातील पहिल्या लेझर क्षेपणास्त्र संरक्षण प्रणालीची यशस्वी चाचणी

रशिया (Russia) - युक्रेन युद्धामुळे जग भयभीत आणि त्रस्त आहे.
laserl Missile Defense System
laserl Missile Defense SystemDainik Gomantak
Published on
Updated on

रशिया-युक्रेन युद्धामुळे जग भयभीत आणि त्रस्त आहे. दोन महिन्यांपूर्वी सुरु झालेले युद्ध थांबण्याचे नाव घेत नाही आहे. हे पाहता उर्वरित देशांनीही पुढील धोके टाळण्यासाठी संरक्षण क्षेत्र मजबूत करण्यास सुरुवात केली आहे. या सगळ्यामध्ये इस्रायलने (laserl) असे काही केले आहे की, 'जे एखाद्या सायन्स फिक्शन चित्रपटासारखे वाटत असले तरी आता ते प्रत्यक्षात आले आहे.' (Israel has successfully tested the world's first laser missile defense system)

laserl Missile Defense System
...तर आम्ही हे युद्ध खूप आधीच संपवले असते: राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की

संरक्षण एजन्सी राफेल प्रगत प्रणाली तयार केली

इस्रायलने जगातील पहिल्या लेझर क्षेपणास्त्र संरक्षण प्रणालीची यशस्वी चाचणी घेतली आहे. या संरक्षण यंत्रणेच्या मदतीने ड्रोन, मोर्टार, रॉकेट आणि रणगाडाविरोधी क्षेपणास्त्रे एकाच हल्ल्यात नष्ट करता येतात. ही यंत्रणा इस्रायलच्या हाय-टेक डिफेन्स एजन्सी राफेल अ‍ॅडव्हान्स्ड सिस्टिमने तयार केली आहे.

यूएव्ही रॉकेट आणि मोर्टार लेझरद्वारे नष्ट केले जातील

इस्रायलचे पंतप्रधान नफ्ताली बेनेट (Naftali Bennett) यांनी ट्विटरवर नवीन प्रगत संरक्षण प्रणालीचा व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यात ते म्हणाले, ''इस्रायलने नवीन आयर्न बीम लेझर इंटरसेप्शन सिस्टमची यशस्वी चाचणी केली आहे. ही जगातील पहिली ऊर्जा आधारित शस्त्र प्रणाली आहे. ते लेझरच्या मदतीने यूएव्ही रॉकेट आणि मोर्टार पाडू शकते.''

विशेष म्हणजे या संरक्षण प्रणालीच्या एका वार ची किंमत एका पिझ्झापेक्षा कमी आहे. यासह, हल्ला करण्यासाठी फक्त $ 3.50 म्हणजेच सुमारे 267 रुपये खर्च येतो.

laserl Missile Defense System
युक्रेनला मिळाले नवे बळ, अमेरिका देणार लष्करी विमान

अनेक वर्षांपासून चाचणी सुरु होती

इस्रायलचे संरक्षण मंत्रालय अनेक वर्षांपासून या लेझर-आधारित संरक्षण प्रणालीची चाचणी घेत आहे. गेल्या वर्षी त्यांनी एक ड्रोन पाडला होता. अलीकडेच त्याची अनगाइडेड प्रोजेक्टाइल्स आणि टँकविरोधी क्षेपणास्त्रांवर चाचणी घेण्यात आली जी यशस्वी झाली.

या वर्षाच्या अखेरीस ही यंत्रणा तयार होईल

संशोधन आणि विकास विभागाने याआधी 2024 पर्यंत ही क्षेपणास्त्रविरोधी यंत्रणा तैनात करण्याची योजना आखली होती, परंतु इस्रायली सैन्याने लवकर तयारी करण्याचा आग्रह धरला. यानंतर पंतप्रधान नफ्ताली बेनेट यांनी फेब्रुवारीमध्ये घोषणा केली की, इस्रायल यावर्षी ही यंत्रणा तैनात करेल. इस्रायलच्या संरक्षण मंत्रालयाने सांगितले की, ''ही प्रणाली इतर हवाई संरक्षण प्रणालींच्या तुलनेत अतिशय प्रभावी, वापरण्यास सोपी आणि अतिशय स्वस्त आहे. हवाई संरक्षण प्रणालीसाठी लेझर तंत्रज्ञानाचा वापर करण्यात यशस्वी होणारा इस्रायल हा जगातील पहिला देश आहे.''

इराण आणि हमासशी स्पर्धा करण्याची तयारी

इराण (Iran) आणि हमास या आपल्या कट्टर शत्रूंचा मुकाबला करण्यासाठी इस्रायल आपली संरक्षण यंत्रणा मजबूत करत आहे. इस्रायल-गाझा युद्धाच्या पहिल्या वर्धापन दिनाच्या पाश्वभूमीवर क्षेपणास्त्र संरक्षण प्रणालीची यशस्वी चाचणी जाहीर करण्यात आली आहे. गेल्या वर्षी मे महिन्यात इस्रायल आणि गाझा यांच्यात 11 दिवसांचे युद्ध झाले होते. यावेळी, गाझाच्या सत्ताधारी हमास या दहशतवादी संघटनेने इस्रायलवर 4,000 हून अधिक रॉकेट डागले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com