Israel-Hams War: हमासच्या दहशतवाद्यांची एवढी भीती... मुलगी बोलायला विसरली; व्हिडिओ

9 Year Old Released Hamas Hostage Forgot To Speak: थॉमस हँड यांनी टॅब्लॉइड द सनशी बोलताना सांगितले की, तिला तिच्या अपहरणकर्त्यांनी शांत राहण्याचे आदेश दिले होते, ज्याची तिला आता सवय झाली आहे.
9 Year Old Released Hamas Hostage Forgot To Speak
9 Year Old Released Hamas Hostage Forgot To SpeakDainik Gomantak
Published on
Updated on

9 Year Old Released Hamas Hostage Forgot To Speak: एमिली हँड या नऊ वर्षांच्या मुलीला हमासने 50 दिवस ओलिस ठेवल्यानंतर मुक्त केले, ती आता फक्त शांत-शांत राहते. तिचे वडील थॉमस हँड यांनी टॅब्लॉइड द सनशी बोलताना सांगितले की, तिला तिच्या अपहरणकर्त्यांनी शांत राहण्याचे आदेश दिले होते, ज्याची तिला आता सवय झाली आहे.

'एमिली एक आनंदी मुलगी होती'

थॉमस हँड म्हणाले की, एमिली एक आनंदी, उत्साही मुलगी होती, पण आता ती शांत-शांत राहते. घरच्यांशी बोलायलाही ती घाबरते. ते पुढे म्हणाले की, गेल्या 50 दिवसांपासून तिला फक्त शांत राहण्याची सवय झाली आहे.

'आमची मुलगी मेली'

एमिलीचे वडील थॉमस यांचे म्हणणे आहे की, आमच्या मुलीचा मृत्यू झाला असे आम्ही गृहीत धरले आहे. थॉमस यांनी पुढे सांगितले की, मुलगी परत आल्याने आम्ही खूप खूश आहोत, पण तिचे वजन कमी झाले आहे आणि आता ती आनंदी नाही. आयरिश-इस्त्रायली नागरिक एमिली 7 ऑक्टोबर रोजी बिरी किबुत्झ इथे मित्राच्या घरी झोपली होती, तेव्हा हमासच्या (Hamas) दहशतवाद्यांनी घरावर हल्ला करुन तिला बंधक बनवले होते.

9 Year Old Released Hamas Hostage Forgot To Speak
Israel-Hamas War: हमासने इस्रायलसमोर टेकले गुडघे; युद्धबंदी करार वाढवण्यासाठी...

ओलिसांची सुटका केली जात आहे

हमास आणि इस्रायलमधील (Israel) युद्धविराम करारांतर्गत 60 इस्रायली ओलीस आणि 180 पॅलेस्टिनी कैद्यांची सुटका करण्यात आली आहे. हमासने करारानुसार महिला आणि मुलांना सोडले आहे. इस्रायली सैन्याने म्हटले आहे की, त्यांनी 10 इस्रायली कैदी आणि गाझामधील चार थाई नागरिकांची सुटका केली आहे, याआधी रशियन नागरिकत्व असलेल्या दोन इस्रायलींना सोडले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com