Israel-Hamas Conflict: हमासची संपत्ती ऐकूण तुम्ही चक्रावाल; इस्राइलचा दावा

Israel-Hamas War: खालिद मशाल हा हमासचा प्रमुख नेत्यांपैकी एक आहे की, ज्याने केरळमधील पॅलेस्टाइन समर्थकांच्या रॅलीला व्हर्चुअली संबोधित केले होते.
Israel–Hamas war 2023
Israel–Hamas war 2023Dainik Gomantak
Published on: 
Updated on: 

Israel-Hamas War 2023: हमासने इस्राइलवर हल्ला केला आणि इस्राइलने युद्ध घोषित केले आहे. आता हा संघर्ष वाढताना दिसत आहे. या युद्धात नऊ हजारापेक्षा जास्त लोकांनी आपला जीव गमावल्याची माहीती समोर आली आहे.

दिवसेंदिवस हा संघर्ष वाढत असताना आता इस्राइलने हमासचे प्रमुख किती कमाई करतात याची आकडेवारी समोर आणली आहे.

इस्रायलचा दावा आहे की हमासची वार्षिक कमाई $1 बिलियन डॉलर आहे. इस्रायलच्या अहवालात असे म्हटले आहे की हमास नेता अबू मारझौकची एकूण संपत्ती $3 बिलियन डॉलर आहे, हमास नेते खालेद मशालची एकूण संपत्ती $4 बिलियन डॉलर आहे, तर इस्माईल हनीयेची एकूण संपत्ती $4 बिलियन डॉलर आहे.

इस्राइलच्या म्हणण्यानुसार, हमासचा समूह आणि त्यांच्या नेत्यांकडे इतकी संपत्ती असूनदेखील गाझा पट्टीतील नागरिकांकडे गरजेच्या आणि जीवनावश्यक वस्तू नसल्याचे इस्राइलने आपल्या अहवालात म्हटले आहे.

मिळालेल्या माहीतीनुसार, खालिद मशाल हा हमासचा प्रमुख नेत्यांपैकी एक आहे की, ज्याने केरळमधील पॅलेस्टाइन समर्थकांच्या रॅलीला व्हर्चुअली संबोधित केले होते. खालिद मशाल हा हमास पोलित ब्यूरोचा संस्थापक सदस्य आहे आणि २०१७ पर्यंत तो अध्यक्षदेखील होता.

Israel–Hamas war 2023
"जगाला आतातरी कळाले असेल त्याने असे का केले," पाकिस्तानी खासदाराच्या ट्विटमुळे जगभरात गदारोळ

गाझाची एकूण लोकसंख्या २३ लाख इतकी आहे. जगातील जास्त घनता असलेल्या प्रदेशापैकी एक गाझा आहे.

आता इस्राइल-हमास संघर्षानंतर या प्रदेशामध्ये नागरिकांचे हाल होताना दिसत आहे. अन्न, पाणी, वीज साठी देखील नागरिकांना त्रास सहन करावा लागत असल्याची माहीती समोर आली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.