Pakistan DG ISPR, Major General Ahmed Sharif Chaudhary
Pakistan DG ISPR, Major General Ahmed Sharif ChaudharyDainik Gomantak

Watch Video: पाकिस्तानमधील टार्गेट किलिंगमध्ये भारताचा हात; पाक लष्करी अधिकाऱ्याच्या दाव्याने खळबळ

Target Killing: पाकिस्तान पुन्हा एकदा भारताविरुद्ध बाष्कळपणे बडबडला आहे. पाकिस्तानकडून भारतावर काही आरोप करण्यात आले आहेत.
Published on

Target Killing: पाकिस्तान पुन्हा एकदा भारताविरुद्ध बाष्कळपणे बडबडला आहे. पाकिस्तानकडून भारतावर काही आरोप करण्यात आले आहेत. इंटर सर्व्हिसेस पब्लिक रिलेशन्स (ISPR)चे महासंचालक (DG) मेजर जनरल अहमद शरीफ चौधरी यांनी नुकत्याच झालेल्या टार्गेट किलिंग प्रकरणात भारताचा हात असल्याचा आरोप केला. याचे सबळ पुरावे पाकिस्तानकडे असल्याचेही ते म्हणाले. पाकिस्तानने केलेल्या आरोपांवर सध्या भारताकडून कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही.

दरम्यान, भारत (India) अनेक देशात अशाप्रकारच्या टार्गेट किलिंग करत असल्याचे देखील ते म्हणाले. कॅनडात शीख फुटीरतावादी नेता हरदीपसिंग निज्जर याच्या हत्येपासून सुरुवात करुन पाकिस्तानमधील अनेक हत्यांमध्ये भारताचा हात होता. मेजर जनरल अहमद शरीफ चौधरी यांनी रावळपिंडी येथील लष्करी मुख्यालयात एका मुलाखतीदरम्यान भारतावर हे आरोप केले.

Pakistan DG ISPR, Major General Ahmed Sharif Chaudhary
Pakistan Court: पाकिस्तान कोर्टाचा धक्कादायक निर्णय, आरोपीला दिली 80 फटके मारण्याची शिक्षा; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण

भारताने नियमांचे उल्लंघन केल्याचा पाकिस्तानचा दावा

पाकिस्तानपेक्षा भारताने एलओसीवर नियमांचे अधिक वेळा उल्लंघन केल्याचा दावाही अहमद शरीफ चौधरी यांनी मुलाखतीदरम्यान केला. नियंत्रण रेषेवर अनेकदा आक्रमक भूमिका घेण्याचे आणि निवडणुकीच्या वेळी पाकिस्तानविरोधी वक्तव्ये करुन अनेक अंतर्गत मुद्द्यांवरुन जनतेचे लक्ष भटकावण्याते तंत्र भारताला अवगत असल्याचेही ते पुढे म्हणाले.

Pakistan DG ISPR, Major General Ahmed Sharif Chaudhary
India Pakistan Tension: 'पाकिस्तानात घुसून दहशतवाद्यांना ठार करु', राजनाथ सिंह यांच्या वक्तव्यावर चवताळला पाकिस्तान; म्हणाला...

काश्मिरींचा आवाज दाबण्याचा डाव

मेजर जनरल चौधरी शेवटी म्हणाले की, सध्या भारतात लोकसभेच्या निवडणुका होत आहेत. अशा स्थितीत जम्मू-काश्मीरमधील (Jammu and Kashmir) पाच जागांसाठी पाच वेगवेगळ्या दिवशी निवडणुका घेण्याचा एकमेव उद्देश काश्मिरींचा आवाज दाबणे आणि निवडणूक निकालांमध्ये हेरफार करण्याचा भारण्याचा डाव आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com