
Islamic State Rebels Attack in Eastern Congo: पूर्व कांगोमध्ये इस्लामिक स्टेट समर्थित बंडखोरांनी एका चर्चवर हल्ला केला. रविवारी (27 जुलै) पहाटे झालेल्या या हल्ल्यात 21 लोक ठार झाल्याची माहिती एका नेत्याने दिली. हा हल्ला पूर्व कांगोच्या कोमांडा (Komanda) येथील कॅथोलिक चर्च (Catholic Church) परिसरात मध्यरात्री 1 वाजण्याच्या सुमारास अलाईड डेमोक्रॅटिक फोर्स (एडीएफ - Allied Democratic Forces - ADF) च्या बंडखोरांनी केला. या हल्ल्यात अनेक घरे आणि दुकानेही जाळण्यात आली.
दरम्यान, कोमांडा येथील नागरिक संस्थेचे समन्वयक डियूडोने डुरानथाबो (Dieudonne Duranthabo) यांनी 'ॲसोसिएटेड प्रेस'ला (Associated Press) सांगितले की, "21हून अधिक लोकांना गोळ्या घालण्यात आल्या. आम्हाला तीन जळालेले मृतदेह (Burnt Bodies) सापडले. याशिवाय, अनेक घरे जळाल्याचीही माहिती आहे. सध्या शोध मोहीम (Search Operation) सुरु आहे." दुसरीकडे, कोमांडा येथे असलेल्या इतुरी प्रांतातील (Ituri Province) कांगो सैन्याच्या (Congo Army) प्रवक्त्याने 10 लोकांच्या मृत्यूची पुष्टी केली.
इतुरीमधील डीआरसी (Democratic Republic of the Congo - DRC) सैन्याचे प्रवक्ते लेफ्टनंट ज्यूल्स एनगोंगो (Lt. Jules Ngongo) यांनी सांगितले की, "आज सकाळी आम्हाला कळले की कोमांडापासून काही अंतरावर असलेल्या एका चर्चमध्ये सशस्त्र लोकांनी घुसखोरी केली, जिथे अनेक लोकांची हत्या करण्यात आली आणि काही दुकानांना आग लावली." या महिन्याच्या सुरुवातीलाही या समूहाने इतुरीमध्ये डझनभर लोकांची हत्या केली होती, ज्याला संयुक्त राष्ट्रांच्या (United Nations) प्रवक्त्याने 'रक्तपात' (Bloody Conflict) म्हटले होते.
इस्लामिक स्टेटशी संबंधित एडीएफ (ADF) हा युगांडा (Uganda) आणि कांगो (Congo) यांच्यातील सीमावर्ती भागात (Border Region) सक्रिय असलेला एक बंडखोर गट (Rebel Group) आहे, ज्याने नागरिकांवर सतत हल्ले केले आहेत.
एडीएफची स्थापना 1990 च्या दशकाच्या उत्तरार्धात युगांडामध्ये योवेरी मुसेवेनी (Yoweri Museveni) यांच्यावरील असंतोषानंतर वेगवेगळ्या लहान गटांनी केली होती.
2002 मध्ये, युगांडाच्या सैन्याने केलेल्या लष्करी हल्ल्यांनंतर, या गटाने आपली (DRC) डेमोक्रॅटिक रिपब्लिक ऑफ कांगो (Congo) येथे स्थलांतरित केली आणि तेव्हापासून हजारो नागरिकांच्या हत्यांसाठी हा गट जबाबदार आहे.
2019 मध्ये, या गटाने इस्लामिक स्टेटशी निष्ठा (Allegiance) व्यक्त केली. एडीएफचे नेतृत्व या पूर्व आफ्रिकन देशात (East African Country) इस्लामी सरकारची (Islamic Government) कल्पना करते.
दुसरीकडे, या हल्ल्यामुळे या भागातील अशांतता आणि नागरिकांच्या (Citizens) सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.