Fact Check: विषबाधा झाल्याने हाफिज सईद खरंच आयसीयूमध्ये आहे का? जाणून घ्या व्हायरल दाव्यामागील सत्य

Hafiz Saeed: दरम्यान सोशल मीडियावर कालपासून दावा केला जास आहे की, हाफिज सईदला तुरुंगात विषबाधा झाल्याने त्याला आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले आहे.
Hafiz Saeed
Hafiz SaeedDainik Gomantak

दहशतवादी आणि लष्कर-ए-तैयबाचा प्रमुख हाफिज सईद पाकिस्तानच्या तुरुंगात कैद आहे. टेरर फंडिंग प्रकरणात संयुक्त राष्ट्रांच्या दबावानंतर पाकिस्तानने त्याला तुरुंगात ठेवले आहे.

दरम्यान सोशल मीडियावर कालपासून दावा केला जास आहे की, हाफिज सईदला तुरुंगात विषबाधा झाल्याने त्याला आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले आहे.

दावा

दरम्यान, सईदला विषबाधा झाल्याची बातमी सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हाफिज सईदला तुरुंगात कोणीतरी विष दिल्याने तो गंभीर अवस्थेत आयसीयूमध्ये दाखल आहे, असा दावा करण्यात येत आहे.  

दरम्यान 'एक्स'वर एका युजरने पोस्ट करत म्हटले की, हाफिज सईदला साहेब म्हणणाऱ्यांच्या घरी आज स्वयंपाक बनवला जाणार नाही. 26/11 च्या दहशतवादी हल्ल्याचा सईद मास्टर माईंड होता. तो 166 लोकांच्या मृत्यूला जबाबदार होता.

2014 पूर्वी कसाबसारख्या दहशतवाद्याला बिर्याणी खाऊ घातली जायची. आता मोदींच्या जमान्यात दहशतवाद्यांना विषारी खीर खाऊ घातली जाते.

दुसऱ्या एका युजरने एक्सवर पोस्ट करत म्हटले आहे की, हाफिज सईदला विषबाधा झाली असून, तो सध्या आयसीयूमध्ये आहे.

सत्य

७४ वर्षीय हाफिज सईद पाकिस्तानच्या तुरुंगात बंद आहे. तो पूर्णपणे बरा असून, आतापर्यंत त्यांच्या प्रकृतीबाबत अशी कोणतीही बातमी समोर आलेली नाही.

हाफिज सईदशी संबंधित बातम्या कोणत्याही पाकिस्तानी वृत्तपत्र किंवा वेबसाइटवर प्रसिद्ध झालेल्या नाहीत.

सोशल मीडियावर केले जाणारे दावे अत्यंत दिशाभूल करणारे आणि चुकीचे आहेत. हाफिज सईद निरोगी असून तो शिक्षा भोगत आहे. त्याच्यावर टेरर फंडिंगचे गंभीर आरोप आहेत.

कोण आहे हाफिज सईद

हाफिज सईद हा भारतासाठी क्रमांक एकचा वाँटेड दहशतवादी आहे. भारत सरकार त्याच्या प्रत्यार्पणासाठी जागतिक पातळीवर दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे.

हाफिज सईद हा 26/11 च्या मुंबई दहशतवादी हल्ल्याचा मुख्य सुत्रधार आहे. हाफिज सईद पाकिस्तानात राहून अनेकदा भारतविरोधी कारवाया करायचा. काश्मीरमधील अशांतता आणि घुसखोरीसाठीही त्याला जबाबदार धरले जाते.

हाफिज सईदने मुंबई दहशतवादी हल्ल्याची योजना आखली होती. पुलवामा हल्ल्यातील त्याचा सहभागही समोर आला आहे.

भारत सरकार अनेक दिवसांपासून त्याच्या प्रत्यार्पणासाठी प्रयत्न करत आहे, मात्र अद्यापपर्यंत त्याला यश आलेले नाही.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com