Pentagon Intel Leaked: पेंटागॉनकडून लीक झालेल्या गोपनीय दस्तऐवजांची अमेरिकेने चौकशी सुरु केली आहे. मात्र, लीक झालेल्या माहितीने केवळ शत्रूच नाही तर अमेरिकेचे मित्र देशही हैराण झाले आहेत.
अमेरिकेच्या या गोपनीय दस्तऐवजांचे लीक होणे अमेरिकेसाठी लाजिरवाणे आणि अमेरिकेच्या मित्र राष्ट्रांसाठी धोकादायक आहे, कारण युक्रेनच्या हवाई संरक्षणापासून ते इस्रायलच्या मोसाद गुप्तहेर संस्थेपर्यंत सर्व गोष्टींची माहिती उघड झाली आहे.
एका अधिकार्याने असेही सांगितले की या लीकमागे इतर कोणाच्या ऐवजी अमेरिकन व्यक्तीचा हात असू शकतो.
लीक झालेल्या या कागदपत्रांमध्ये रशिया-युक्रेन युद्ध, चीन (China), मध्य पूर्व आणि आफ्रिका, दक्षिण कोरिया आणि इतरांशी संबंधित माहिती आहे.
पेंटागॉनचे माजी वरिष्ठ अधिकारी मायकेल मुलरॉय यांनी एका मुलाखतीत सांगितले की, "लीकचे संपूर्ण प्रकरण गांभीर्याने घेतले जात आहे"
तसेच, लष्करी दस्तऐवज लीक होण्यामागे रशिया किंवा रशिया (Russia) समर्थक घटकांचा हात असल्याचा आरोप अमेरिकन अधिकाऱ्यांनी केला आहे, परंतु याला पुष्टी मिळालेली नाही.
मात्र, मॉस्कोने याबाबत कोणतेही उत्तर दिलेले नाही. लीक झालेल्या दस्तऐवजांमध्ये गुप्त अहवाल असून काही दस्तऐवज पोस्ट करण्यापूर्वी बदलले गेले असावेत.
इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्या सर्वोच्च न्यायालयावर संपूर्ण ताबा मिळवण्याच्या योजनेच्या विरोधात गुप्तचर एजन्सी मोसाद निदर्शने करत असल्याचे कागदपत्रातून उघड झाले आहे.
तथापि, नेतन्याहू यांच्या कार्यालयाने रविवारी एक निवेदन जारी करुन हा दावा खोटा आणि कोणताही आधार नसलेला असल्याचे म्हटले आहे.
त्याचबरोबर, दुसर्या दस्तऐवजात दक्षिण कोरियाच्या वरिष्ठ अधिकार्यांमध्ये युक्रेनला शस्त्रास्त्र पुरवठा करण्यात मदत करण्यासाठी अमेरिकेच्या दबावाबद्दल आणि तसे न करण्याच्या धोरणाबद्दल दक्षिण कोरियाच्या वरिष्ठ अधिकार्यांमधील अंतर्गत चर्चेचा तपशील देखील आहे.
तथापि दक्षिण कोरियाच्या अधिकाऱ्याने रविवारी सांगितले की, देशाला लीक झालेल्या दस्तऐवजांच्या बातम्यांबद्दल माहिती आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.