शूजवर रक्ताचे डाग अन् डोळ्यांत सूडाची आग! 'त्या' 160 मृत मुलींसह इराणच्या अध्यक्षांचा विमान प्रवास; काळीज पिळवटून टाकणाऱ्या फोटोंनी वेधलं जगाचं लक्ष VIDEO

Iran Speaker Emotional Flight Photos Slain Children: गालिबाफ यांनी शनिवारी सकाळी त्यांच्या विमानातील काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले.
Iran Speaker Emotional Flight Photos Slain Children
Iran Speaker Emotional Flight Photos Dainik Gomantak
Published on
Updated on

Iran Speaker Emotional Flight Photos Slain Children: इराणच्या संसदेचे अध्यक्ष मोहम्मद बाघेर गालिबाफ यांच्या नेतृत्वाखालील एका उच्चस्तरीय शिष्टमंडळाचे पाकिस्तानात आगमन झाले. अमेरिका आणि इराण यांच्यातील संभाव्य शांतता चर्चांच्या पार्श्वभूमीवर हा दौरा अत्यंत महत्त्वाचा मानला जात असला, तरी सध्या या दौऱ्यापेक्षा गालिबाफ यांनी शेअर केलेल्या हृदयद्रावक फोटोंची चर्चा जगभरात होत आहे. हे फोटो पाहून कोणाचेही डोळे पाणावल्याशिवाय राहणार नाहीत.

गालिबाफ यांनी शनिवारी सकाळी त्यांच्या विमानातील काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले. या फोटोंमध्ये विमानातील प्रवाशांच्या जागांवर जिवंत माणसे नसून, 28 फेब्रुवारी रोजी इस्रायली आणि अमेरिकन लष्करी हल्ल्यात प्राण गमावलेल्या निष्पाप मुलांचे फोटो, त्यांचे दप्तर आणि रक्ताने माखलेले शूज ठेवलेले दिसत आहेत. इराणमधील (Iran) मीनाब शहरातील एका शाळेवर झालेल्या या हल्ल्यात 160 हून अधिक चिमुकल्या मुलींचा मृत्यू झाला होता. या फोटोंना गालिबाफ यांनी 'माझ्या या प्रवासाचे साथीदार' असे भावूक कॅप्शन दिले.

Iran Speaker Emotional Flight Photos Slain Children
Iran US War Ceasefire: "इराणमध्ये सत्तापालट होणार!" ट्रम्प यांचा मोठा दावा; शस्त्रसंधीनंतर अमेरिकेची अण्वस्त्र तळांवर नजर

प्रत्येक सीटवर मुलांच्या आठवणींसोबत एक फूलही ठेवण्यात आले असून गालिबाफ त्या रिकाम्या जागांकडे अत्यंत शांतपणे आणि गहिवरलेल्या नजरेने पाहत असल्याचे स्पष्ट दिसत आहेत. हा हल्ला इराण कधीही विसरणार नाही आणि ही न भरुन येणारी जखम आहे, हेच यातून अधोरेखित होत आहे.

Iran Speaker Emotional Flight Photos Slain Children
US Iran War Timeline: सुप्रीम लीडरचा अंत, 4000 मृत्यू अन् 90 हजार घरांची राखरांगोळी! अमेरिका-इराण युद्धाच्या टाइमलाइनचा थरारक पट; 40 दिवसांनी रक्तरंजित संघर्षाला ब्रेक

दुसरीकडे, राजकीय पातळीवर बोलताना गालिबाफ यांनी इस्लामाबादमध्ये इराणची भूमिका स्पष्ट मांडली. ते म्हणाले की, इराण कोणत्याही चर्चेत पूर्ण प्रामाणिकपणे सहभागी होत आहे, परंतु आमचा अमेरिकेवर अजिबात विश्वास नाही. गेल्या काही वर्षांतील अनुभव अत्यंत कटू राहिले असून, इराण चर्चेच्या प्रक्रियेत असतानाच एका वर्षात दोनदा युद्ध लादण्यात आले, असे त्यांनी नमूद केले. औपचारिक चर्चा सुरु होण्यापूर्वी अमेरिकेने इराणच्या पूर्वअटी मान्य कराव्या लागतील, असा स्पष्ट इशाराही त्यांनी दिला. जुनी आश्वासने आणि वचनबद्धता पूर्ण केल्याशिवाय कोणत्याही नवीन तहाकडे इराण पाऊल टाकणार नाही, अशी तेहरानची ठाम भूमिका आहे.

Iran Speaker Emotional Flight Photos Slain Children
US Iran War: डेडलाईन संपण्यापूर्वीच अमेरिकेचा मोठा हल्ला! इराणी सैन्याचं अंडरग्राउंड हेडक्वार्टर उद्ध्वस्त; बंकर-बस्टर बॉम्बच्या वर्षावानं चुकला काळजाचा ठोका

या महत्त्वाच्या दौऱ्यात गालिबाफ यांच्यासोबत इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अराघची आणि राष्ट्रीय सुरक्षा परिषदेचे प्रतिनिधी अली अकबर अहमदीन यांच्यासह सुरक्षा, लष्करी आणि आर्थिक क्षेत्रातील तज्ज्ञांचा समावेश आहे. इतक्या वरिष्ठ नेत्यांची उपस्थिती या दौऱ्याचे गांभीर्य दर्शवते. युद्धाच्या सावटाखाली सुरु असलेली ही मुत्सद्देगिरी आणि विमानातील त्या चिमुकल्यांच्या रक्ताळलेल्या आठवणी, यामुळे सध्या संपूर्ण जगाचे लक्ष या इराण-पाकिस्तान (Pakistan) भेटीकडे लागले आहे. ही केवळ एक राजकीय चर्चा नसून आपल्या मुलांच्या मृत्यूचा जाब विचारणाऱ्या एका राष्ट्राची भावनिक सादही असल्याचे दिसून येत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com