Iran Israel War: संतप्त इराणकडून जोरदार मारा! इस्त्राईल हादरले; अमेरिकेच्या हवाई तळावर हल्ला

Israel Attack: अमेरिकेने अणुकेंद्रांवर हल्ले केल्यामुळे संतप्त झालेल्या इराणने दोन टप्प्यांमध्ये इस्राईलवर क्षेपणास्त्र आणि ड्रोनचा मारा केला. कतारमधील अमेरिकी हवाई तळासही लक्ष्य करण्यात आले.
Iran Israel War
Iran Israel Attack X
Published on
Updated on

तेहरान: अमेरिकेने अणुकेंद्रांवर हल्ले केल्यामुळे संतप्त झालेल्या इराणने दोन टप्प्यांमध्ये इस्राईलवर क्षेपणास्त्र आणि ड्रोनचा मारा केला. कतारमधील अमेरिकी हवाई तळासही लक्ष्य करण्यात आले.

इस्राईलवरील हल्ल्यांमध्ये तेल अविव आणि जेरूसलेमसह काही शहरांतील इमारतींचे मोठे नुकसान झाले. इस्राईलनेही इराणच्या फोर्दो अणुकेंद्रांजवळ हल्ले केले. राजधानी तेहरानमध्येही इस्राईलने क्षेपणास्त्रांचा मारा केला. दोन्ही बाजूंकडून तीव्र हल्ले होत असल्याने हा संघर्ष आणखी चिघळणार असल्याचे चित्र निर्माण झाले आहे.

अमेरिकेने रविवारी बाँबर बी-२ विमान आणि बंकर बस्टर बाँबचा वापर करत इराणमधील फोर्दो अणुकेंद्रासह एकूण तीन अणुकेंद्रांना लक्ष्य केले. या हल्ल्याद्वारे अमेरिकेने इस्राईल-इराण युद्धात थेट उडी घेतली आहे.

Iran Israel War
Bunker Buster Bomb: अमेरिकेच्या भात्यातील घातक अस्त्र! जमीन भेदत जाणारा 'बंकर बस्टर बाँब'; ‘बी-२ बॉम्बर’ विमानांचा उपयोग

इराणच्या मदतीस तयार, रशिया

‘‘इराणला मदत करण्याची आमची इच्छा आहे. इराणला जशी आवश्‍यकता असेल आणि त्यांनी त्याबाबत विचारणा केल्यास मदत करण्यास आम्ही तयार आहोत,’’ असे रशियाने जाहीर केले.

Iran Israel War
Iran Israel War: इराण-इस्राईल संघर्षात अमेरिकेची उडी, 3 अणुकेंद्रांवर बाँबवर्षाव; रिव्हॉल्युशनरी गार्डकडून 40 क्षेपणास्त्रांचा मारा

अमेरिकेच्या आक्रमकतेला प्रत्युत्तर

अमेरिकेच्या ठिकाणांवर हल्ल्याचा इशारा देणाऱ्या इराणने आज कतारमधील अमेरिकेच्या अल उदैद हवाई तळावर हल्ला केल्याचा दावा केला. इराणने त्यांच्या सरकारी वाहिनीवरून या हल्ल्याची घोषणा केली. अमेरिकेच्या आक्रमकतेला दिलेले हे अत्यंत यशस्वी प्रत्युत्तर असल्याचे इराणच्या अधिकाऱ्याने सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com