Iran Hijab Protest Girl: सध्या इराणमध्ये हिजाब आंदोलन सुरु आहे. तिथे काही महिला हिजाब न घालण्याची मागणी करत आहेत. या संदर्भात 22 वर्षीय मेहसा अमिनी हिचा मृत्यू झाला. तेव्हापासून या आंदोलनात बरीच वाढ झाली.
तिथे आजही अनेक मौलवी म्हणतात की, हिजाब कायदा कायम राहिला पाहिजे. मात्र, या प्रकरणात इमाम आणि मौलवींनी मर्यादा ओलांडल्या आहेत.
महिलांनी आता हिजाब घातला नाही तर उन्हाळ्यात त्या कपडे काढून टाकतील, असे एका मौलवीने म्हटले आहे. दुसरीकडे, एक इमाम म्हणतो की, त्यांच्यामुळे पाऊस पडला नाही.
दरम्यान, असे वक्तव्य एका मौलवीने केले आहे. हिजाब आंदोलन केवळ इराणमध्येच नाही तर संपूर्ण जगात चर्चेचा विषय बनले आहे. लोकांनी हिजाब परिधान करणाऱ्या महिलांना चुकीच्या पद्धतीपासून सावध केले पाहिजे. अन्यथा त्या महिला (Women) आणि मुली उन्हाळ्यात कपड्यांशिवाय रस्त्यावर येतील, असेही मौलवीने म्हटले आहे.
दुसरीकडे, 22 वर्षीय महसा अमिनीच्या मृत्यूनंतर इराणमध्ये निदर्शने सुरु आहेत. चुकीच्या पद्धतीने हिजाब घातल्याबद्दल काही मुलींना अटकही करण्यात आली. अमिनीच्या समर्थनार्थ पुढे येत, अनेक महिलांनी हिजाब परिधान करणे देखील बंद केले. त्या सनातनी नियमांचा उघडपणे निषेध करत आहेत.
महिलांनी हिजाब न घातल्यामुळे पाऊस पडला नाही, असे गेल्या महिन्यात इराणमधील एका इमामाने भाष्य केले होते. इराणमध्ये पाऊस कमी असल्याने त्याने हिजाब परिधान करण्यास सांगितले. महिलांवर आरोप करताना ते पुढे म्हणाले होते की, त्यांच्यामुळेच इराणमध्ये (Iran) जलसंकट निर्माण झाले आहे.
याशिवाय, इराणचे सर्वोच्च नेते यांचे निकटवर्तीय मोहम्मद-मेहदी हुसैनी हमदानी यांनीही असेच वक्तव्य केले आहे. हिजाबचे नियम मोडून महिलांनी देशभरात जलसंकट निर्माण केले आहे. हिजाब न घालणाऱ्या महिलांना शिक्षा व्हायला हवी, असेही त्यांचे म्हणणे आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.