आनंद ही अशी गोष्ट आहे, ज्याची आजच्या जगात सर्वाधिक गरज आहे. सुख मिळवण्यासाठी लोक काय करत नाहीत? युनायटेड नेशन्स गेल्या दशकापासून दरवर्षी देशांचे वर्गीकरण करुन सांगत आहे की जगातील सर्वात आनंदी देश कोणता आहे? आज इंटरनेशनल डे ऑफ हॅप्पिनस (International Day Of Happiness) आहे. जगातील सर्वात आनंदी असणारे देश तुम्हाला माहिती आहेत का? आता या देशांच्या रॅंकिंगबाबत यूएनने महत्त्वाची माहिती दिली आहे.
दरम्यान, शीर्षस्थानी असलेला युरोपीय देश फिनलँड आहे. फिनलंडने सलग सातव्यांदा हे स्थान पटकावले आहे. त्याचवेळी, तालिबान शासित अफगाणिस्तान जगातील सर्वात आनंदी देशांच्या यादीत शेवटच्या स्थानावर आहे. तर, भारताने मागील वेळेप्रमाणेच आपले रँकिंग कायम ठेवले आहे. जास्तही नाही आणि कमीही नाही. भारताचे रॅंकिंग अफगाणिस्तानपेक्षा थोडे चांगले आहे. नॉर्डिक देशांनी 10 आनंदी देशांमध्ये आपले स्थान कायम ठेवले आहे. डेन्मार्क, आइसलँड आणि स्वीडन यानंतर फिनलंडचा क्रमांक लागतो.
दुसरीकडे, 2020 मध्ये अफगाणिस्तानमध्ये तालिबानने सत्ता स्थापन केल्यापासून या मुस्लिम देशाची परिस्थिती बिकट होत चालली आहे. लोकांना फक्त नोकरी आणि अन्नाची गरज नाही. इथल्या लोकांना त्यांच्या आवडीचे कामही करता येत नाही. उद्यानात फिरणे, हवे ते कपडे घालणे, केस कापणे आणि संगीत ऐकणे यावरही निर्बंध आहेत. तालिबान राजवटीचा सर्वात वाईट परिणाम महिलांवर झाला आहे. UN च्या वार्षिक अहवालात, अफगाणिस्तान या निर्बंधांमुळे प्रभावित झाला आणि जगातील सर्वात आनंदी देशांमध्ये तो 143 व्या स्थानावर आहे. सर्वेक्षणात केवळ 143 देशांनी भाग घेतला.
दरम्यान, यूएन गेल्या दशकभरापासून असे अहवाल प्रकाशित करत आहे. विशेष म्हणजे, या अहवालातील 20 सर्वात आनंदी देशांमध्ये अमेरिका आणि जर्मनीचा समावेश नसण्याची ही पहिलीच वेळ आहे. अमेरिका (America) 23व्या तर जर्मनी 24व्या क्रमांकावर आहे. अमेरिका आणि जर्मनीच्या जागी, कोस्टा रिका आणि कुवेतने अनुक्रमे 12वे आणि 13वे स्थान पटकावले आहे.
संयुक्त राष्ट्रांच्या अहवालात म्हटले आहे की, जगातील लहान आणि समृद्ध राष्ट्रे सर्वात आनंदी देशांच्या यादीत अव्वल आहेत. तर अधिक लोकसंख्या असलेल्या देशांच्या क्रमवारीत बरीच घट झाली आहे. शीर्ष 10 देशांबद्दल बोलायचे झाल्यास, त्यात फक्त नेदरलँड आणि ऑस्ट्रेलियाचा समावेश आहे, ज्यांची लोकसंख्या 15 दशलक्षाहून अधिक आहे. त्याचवेळी, टॉप 20 देशांमध्ये समाविष्ट असलेल्या कॅनडा आणि यूकेची लोकसंख्या 30 दशलक्षाहून अधिक आहे.
आनंदाच्या बाबतीत, जगातील 143 देशांमध्ये भारताचा (India) क्रमांक 126 वा आहे. त्याचवेळी, अफगाणिस्तानचे रँकिंग 143 आहे. UN च्या अहवालानुसार, 2006-10 पासून देशांमधील समृद्धीमध्ये सर्वात जास्त घट अफगाणिस्तान, लेबनॉन आणि जॉर्डन यांच्या रॅंकिंगमध्ये दिसून आली आहे. तर पूर्व युरोपीय देश सर्बिया, बल्गेरिया आणि लॅटव्हिया यांनी क्रमवारीत सुधारणा केली आहे.
दरवर्षी जारी होणाऱ्या आपल्या अहवालात संयुक्त राष्ट्रसंघ संबंधित देशात राहणाऱ्या लोकांच्या जीवनातील समाधानाबाबत सर्वेक्षण करते. यामध्ये दरडोई उत्पन्न, सामाजिक आधार, त्यांचे राहणीमान किती चांगले आहे, त्यांना या देशात किती स्वातंत्र्य आहे इत्यादी मुद्द्यांचा समावेश आहे. याशिवाय, देशातील भ्रष्टाचाराच्या मुद्द्यांवरही अहवालात प्रकाश टाकण्यात आला आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.