International Anti Corruption Day: 9 डिसेंबरलाच का साजरा केला जातो आंतरराष्ट्रीय भ्रष्टाचारविरोधी दिन? जाणून घ्या महत्व

International Anti Corruption Day: दरवर्षी 9 डिसेंबर रोजी आंतरराष्ट्रीय भ्रष्टाचारविरोधी दिन साजरा केला जातो. भ्रष्टाचाराच्या दूरगामी परिणामांबद्दल जागरुकता निर्माण करण्यासाठी आंतरराष्ट्रीय भ्रष्टाचारविरोधी दिन साजरा केला जातो.
International Anti Corruption Day: 9 डिसेंबरलाच का साजरा केला जातो आंतरराष्ट्रीय भ्रष्टाचारविरोधी दिन? जाणून घ्या महत्व
International Anti Corruption DayDainik Gomantak
Published on
Updated on

International Anti Corruption Day: दरवर्षी 9 डिसेंबर रोजी आंतरराष्ट्रीय भ्रष्टाचारविरोधी दिन साजरा केला जातो. भ्रष्टाचाराच्या दूरगामी परिणामांबद्दल जागरुकता निर्माण करण्यासाठी आंतरराष्ट्रीय भ्रष्टाचारविरोधी दिन साजरा केला जातो. भ्रष्टाचाराविरुद्ध जनतेने अधिकाधिक जागरुक झाले पाहिजे. तरच सुसंस्कृत समाज आणि सशक्त लोकशाही देश निर्माण होऊ शकतो. तसेच, हा दिवस सरकार आणि नागरिकांना भ्रष्टाचाराच्या समस्येशी लढण्यासाठी प्रेरित करतो.

आंतरराष्ट्रीय भ्रष्टाचार विरोधी दिन कधी साजरा केला जातो?

हा दिवस दरवर्षी 9 डिसेंबर रोजी साजरा केला जातो, कारण 9 डिसेंबर 2003 रोजी संयुक्त राष्ट्रांनी भ्रष्टाचाराविरुद्ध (Corruption) आंतरराष्ट्रीय करार स्वीकारण्यात आला होता.

International Anti Corruption Day: 9 डिसेंबरलाच का साजरा केला जातो आंतरराष्ट्रीय भ्रष्टाचारविरोधी दिन? जाणून घ्या महत्व
सीरियात मोठी उलथापालथ! बंडखोरांनी सत्ता घेतली ताब्यात; राष्ट्राध्यक्षांनी सोडला देश

सर्वसामान्य नागरिकांना त्रास

दरम्यान, भ्रष्टाचारामुळे संस्थांवरील विश्वास कमी होतो. अर्थव्यवस्था कमकुवत होते. सामाजिक विषमता वाढवते. त्यामुळे शिक्षण, आरोग्यसेवा आणि पायाभूत सुविधांसारख्या महत्त्वाच्या क्षेत्रांच्या प्रगतीत अडथळा येतो. आणि सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे भ्रष्टाचाराचा सर्वाधिक फटका देशातील सामान्य नागरिकाला बसतो.

आंतरराष्ट्रीय भ्रष्टाचार विरोधी दिनाचे महत्त्व काय आहे?

आंतरराष्ट्रीय भ्रष्टाचारविरोधी दिन सामूहिक कृतीच्या महत्त्वावर भर देतो. भ्रष्टाचाराचा मुकाबला करणे म्हणजे कायदे आणि धोरणे बनवणे नव्हे तर दैनंदिन जीवनात प्रामाणिकपणा आणि नैतिक वर्तनाच्या संस्कृतीला चालना देणे हे स्मरण करुन देणारा दिवस आहे.

International Anti Corruption Day: 9 डिसेंबरलाच का साजरा केला जातो आंतरराष्ट्रीय भ्रष्टाचारविरोधी दिन? जाणून घ्या महत्व
Sudan Civil War: सुदानमध्ये वाढली अराजकता, 5 लाख लोकांनी सोडला देश सोडला; 'या' देशाला बनवलयं आश्रयस्थान

लाचखोरीच्या विरोधात उभे राहण्याची प्रेरणा

जागरुकता वाढवणे आणि बदल घडवून आणण्याच्या उद्देशाने अनेक लोक मोहिमा, चर्चा आणि पुढाकार घेऊन हा दिवस साजरा करतात. आंतरराष्ट्रीय भ्रष्टाचारविरोधी दिन जगभरातील लाखो लोकांना लाचखोरी, फसवणूक (Fraud) आणि सत्तेच्या दुरुपयोगाविरुद्ध उभे राहण्याची प्रेरणा देतो.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com