कोरोनानंतर अमेरिकेत RS विषाणूचा शिरकाव

अमेरिकेत (America) कोरोना विषाणूच्या डेल्टा व्हेरिएंटमुळे रुग्णांच्या संख्येमध्ये वाढ झाली आहे.
Respiratory Syncytial Virus
Respiratory Syncytial VirusDainik Gomantak
Published on
Updated on

अमेरिकेत (America) कोरोना विषाणूच्या डेल्टा व्हेरिएंटमुळे रुग्णांच्या संख्येमध्ये वाढ झाली आहे. दरम्यान, आता आणखी एका विषाणूचा धोका वाढत आहे. या विषाणूचं संक्रमण नाकावाटे होते. याला श्वसन संश्लेषण विषाणू किंवा RSV असेही म्हणतात. हे अत्यंत संसर्गजन्य आहे. या विषाणूची फ्लू सारखी लक्षणे आहेत. प्रसारमाध्यमांच्या अहवालानुसार, विषाणूचा सर्वाधिक धोका मुलांना आहे.

न्यूयॉर्क टाइम्सच्या अहवालानुसार, यूएस सेंटर फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेंशन (NCDC) च्या आकडेवारीवरुन असे दिसून आले आहे की, जूनपासून आरएसव्ही विषाणूचा झपाट्याने प्रसार वाढू लागला आहे. तर गेल्या महिन्यात आरएसव्ही रुग्णांमध्ये अधिक वाढ दिसून आली आहे. (रेस्पिरेटरी सिन्सिटियल व्हायरस लक्षणे). यामुळे नाक वाहणे, खोकला, शिंका येणे आणि ताप येतो. ''आम्ही लहान मुले आणि किशोरवयीन मुले रुग्णालयात परत येताना पाहत आहोत," टेक्सासमधील बालरोगतज्ञ हिथर हॉक्स (Heather hawks) यांनी म्हटले आहे.

Respiratory Syncytial Virus
Covid19: चीनच्या लॅबमधूनच कोरोना लिक! US रिपब्लिकनचा अहवाल

केसेस 148% वाढ झाली

हिथर हॉक्स यांनी आपल्या पुढील ट्विटमध्ये म्हटले की, 'आम्ही कोरोनाच्या वाढत्या केसेस ना सामोरे जात आहोत. वाढती रुग्णासंख्या हाताळण्यासाठी आमच्याकडे बेड आणि कर्मचारी कमी असतील. तर रुग्णालयांमध्ये रूग्णांच्या प्रवेशाचे प्रमाण 73 टक्क्यांनी वाढले आहे. (रेस्पिरेटरी सिन्सायटियल व्हायरस इन्फेक्शन). आरोग्य अधिकारी म्हणतात की, देशभरात शाळा पुन्हा उघडल्यास मुलांमधील संसर्गाचा धोका अधिक वाढेल.

Respiratory Syncytial Virus
Corona Virus: रुग्णांच्या आकडेवारीत भारत जगात चौथ्या स्थानावर

जूनमध्ये केसेस वाढू लागली

टेक्सास आरोग्य विभागाचे म्हणणे आहे की, आरएसव्हीची प्रकरणे जूनच्या सुरुवातीला वाढू लागली आणि जुलैच्या मध्यावर पोहोचली. फ्लोरिडामध्येही त्याच्या केसेसमध्ये वाढ झाली. गेल्या दोन आठवड्यांत लुईझियानामध्ये केसेस 244 टक्क्यांनी वाढल्या आहेत. ओक्लाहोमा येथील डॉक्टरांनी सांगितले की, येथेही केसेस वाढत आहेत. यूएस व्यतिरिक्त, कॅनडा, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड सारख्या देशांमध्ये देखील आरएसव्ही संसर्गाच्या प्रकरणांमध्ये वाढ झाली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com