खोकला म्हणून सिंगापूरमध्ये भारतीय वंशाच्या नागरिकाला तुरुंगवासाची शिक्षा, नेमकं काय घडलं?

तमिलसेल्वम असे या व्यक्तीचे नाव असून, ते सिंगापूरमध्ये क्लिनर म्हणून काम करतात.
Singapore Crime
Singapore CrimeDainik gomantak
Published on
Updated on

Singapore: कोरोना नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल सिंगापूरमधील भारतीय वंशाच्या 64 वर्षीय व्यक्तीला दोन आठवडे तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. कोरोनाची लागण होऊनही त्या व्यक्तीने मास्क लावला नाही आणि सहकाऱ्यांवर खोकला असा आरोप त्याच्यावर करण्यात आला आहे.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, तमिलसेल्वम असे या व्यक्तीचे नाव आहे जो लिओंग हुप सिंगापूरमध्ये क्लिनर म्हणून काम करत होता.

18 ऑक्टोबर 2021 रोजी तमिलसेल्वम यांनी कामाच्यावेळी त्यांची तब्येत ठीक नाही असे त्यांच्या असिस्टंट लॉजिस्टिक मॅनेजरला सांगितले. त्यावेळी कोरोनाची साथ पसरत असल्याने तमिलसेल्वम यांची कोरोना चाचणी करण्यात आली. ज्यामध्ये तमिलसेल्वम यांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले.

यानंतर तमिलसेल्वम यांना घरी जाण्यास सांगण्यात आले. तमिळसेल्वम लगेच घरी न जाता त्यांच्या असिस्टंट लॉजिस्टिक मॅनेजरचे कार्यालय गाठून त्यांना याबाबत सांगितले.

दरम्यान, तमिलसेल्वम यांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती असिस्टंट लॉजिस्टिक मॅनेजरला आधीच मिळाली होती. तामिळसेल्वम यांना तातडीने कार्यालय सोडण्यास सांगितले. पण, तमिलसेल्वम खोकत कार्यालयात फिरले असा आरोप त्यांच्यावर करण्यात आला आहे.

संपूर्ण घटना कार्यालयात लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. एवढेच नाही तर यानंतरही तमिळसेल्वम यांनी गंमतीने मास्क खाली केला आणि अनेक वेळा खोकला. यामुळे सहकारी नाराज झाले. एक सहकारी लिपिक किडनीच्या आजाराने त्रस्त होता, त्यामुळे त्यांना खूप त्रास होत होता. तरीही खोकल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात येत आहे.

सहकाऱ्यांनी याप्रकरणाची पोलिसांत तक्रार केली. तपासादरम्यान, तमिलसेल्वम यांनी मस्करी मस्करीत असे केले होते आणि त्यांनी कोरोना संसर्गाला गांभीर्याने घेतले नव्हते असे सांगितले. दरम्यान, न्यायालयाने तमिलसेल्वम यांना दोषी ठरवले आहे.

सिंगापूरमध्ये कोरोना नियमांचे उल्लंघन केल्यास सहा महिने तुरुंगवास आणि 10 हजार सिंगापूर डॉलर्सचा दंड होऊ शकतो.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Goa Drug Case
Mapusa POCSO Court Verdict
RG Party Expulsion News
Goa Politics
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com