Sunita Williams: अंतराळवीर सुनीता विल्यम्स पुन्हा एकदा रचणार इतिहास; जाणून घ्या कोणती कामगिरी करणार आहेत?

Indian Origin Astronaut Captain Sunita Williams: भारतीय वंशाच्या अंतराळवीर कॅप्टन सुनीता विल्यम्स पुन्हा एकदा इतिहास रचणार आहेत. त्या पुन्हा एकदा अंतराळ प्रवासासाठी निघणार आहेत.
Indian Origin Astronaut Captain Sunita Williams
Indian Origin Astronaut Captain Sunita Williams@NASA

Indian Origin Astronaut Captain Sunita Williams: भारतीय वंशाच्या अंतराळवीर कॅप्टन सुनीता विल्यम्स पुन्हा एकदा इतिहास रचणार आहेत. त्या पुन्हा एकदा अंतराळ प्रवासासाठी निघणार आहेत. यावेळी त्या न्यू स्पेसशिप बोइंग स्टारलाइनरच्या मदतीने प्रवास करणार आहेत. 7 मे 2024 रोजी भारतीय वेळेनुसार सकाळी 8.34 8.04 वाजता केनेडी स्पेस सेंटरमधून त्या अंतराळ प्रवासासाठी निघणार आहेत. दरम्यान, या अंतराळ प्रवासाबद्दल विचारले असता त्यांनी सांगितले की, ‘’मी थोडी दडपणाखाली आहे, परंतु न्यू स्पेसशिपमधून उड्डाण करण्यासाठी सज्ज आहे. जेव्हा मी पुन्हा एकदा इंटरनेशनल स्पेस स्टेशन येथे पोहोचले तेव्हा मला पुन्हा घरी आल्यासारखे वाटेल.’’

दरम्यान, 59 वर्षीय सुनीता विल्यम्स 2006 आणि 2012 मध्ये दोनदा अंतराळात गेल्या होत्या. नासाच्या नोंदीनुसार, त्यांनी आतापर्यंत एकूण 322 दिवस अंतराळात घालवले आहेत. त्या जगातील पहिली महिला अंतराळवीर आहेत, ज्यांनी सर्वाधिक प्रदीर्घ स्पेसवॉक केला आहे. त्यांनी एकूण 50 तास 40 मिनिटे स्पेसवॉक केला आहे. या काळात त्यांनी 7 वेळा स्पेसवॉक केले.

Indian Origin Astronaut Captain Sunita Williams
America Sanctions: बायडन सरकारची मोठी कारवाई, इराणसोबत व्यापार करणाऱ्या 3 भारतीय कंपन्यांवर बंदी; वाचा नेमकं प्रकरण

सुनीता गणपतीची मूर्ती अंतराळात घेऊन जाणार आहेत

नासाचे म्हणणे आहे की, सुनीता सध्या बोईंगच्या स्टारलाइनर स्पेसशिपवरील क्रू फ्लाइट टेस्ट मिशनची पायलट बनण्याची तयारी करत आहेत, जे पहिले उड्डाण आहे. याशिवाय, हे त्यांचे तिसरे मिशन आहे. 1998 मध्ये त्यांची पहिल्यांदा अंतराळवीर म्हणून निवड झाली होती. त्यानंतर 2015 मध्ये त्यांनी स्पेस शटल मिशनमधून निवृत्ती घेतली. त्यांनी एनडीटीव्हीला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, त्या अताच्या अंतराळ प्रवासात आपल्यासोबत गणपतीची मूर्ती घेऊन जाणार आहेत. याआधी, त्यांच्या शेवटच्या प्रवासात त्यांनी ‘भगवद्गीता’ आपल्यासोबत घेऊन गेल्या होत्या.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com