अफगाणिस्तानातील शीख आणि हिंदू नागरिकांना भारताकडून ई-व्हिसा

गुरूद्वारावरील हल्ल्यानंतर पवित्र ग्रंथ गुरु ग्रंथ साहिब सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आला.
Indian government issues e visas to Hindus in Afghanistan
Indian government issues e visas to Hindus in AfghanistanDainik Gomantak
Published on
Updated on

भारत सरकारने अफगाणिस्तानातील 100 हून अधिक शीख आणि हिंदू नागरिकांना भारताचा व्हिसा देण्याचा निर्णय घेतला आहे. सरकारने ई-व्हिसा जारी केला आहे. एक दिवस आधी 18 जून रोजी राजधानी काबूलमधील गुरुद्वारा कर्ते परवानवर दहशतवादी हल्ला झाला होता. दहशतवाद्यांनी येथे अनेक स्फोट घडवले होते.

Indian government issues e visas to Hindus in Afghanistan
Sri Lanka Crisis: इंधनाच्या बचतीसाठी पुढील आठवड्यापासून सरकारी कार्यालये-शाळा बंदची घोषणा

या हल्ल्यात गुरुद्वाराचा मुस्लिम सुरक्षा रक्षक ठार झाला. तिघांना बाहेर काढण्यात आले. त्यापैकी दोघांना जखमी अवस्थेत रुग्णालयात पाठवण्यात आले. कर्ते परवान गुरुद्वारा समितीचे सदस्य तलविंदर सिंग चावला यांनी घटनास्थळाबाहेरून सांगितले की, जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

Indian government issues e visas to Hindus in Afghanistan
अमेरिकेचं 'सरकार' सायकलवरुन पडलं, जो बायडन यांचा व्हिडीओ होतोय व्हायरलं

पवित्र ग्रंथ सुखरूप बाहेर काढण्यात आला
गुरूद्वारावरील हल्ल्यानंतर पवित्र ग्रंथ गुरु ग्रंथ साहिब सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आला. अफगाण शीख पवित्र ग्रंथ वाचवण्यासाठी आग लागलेल्या इमारतीत घुसले होते. या हल्ल्यानंतर परराष्ट्र मंत्रालयाचे (MEA) प्रवक्ते अरिंदम बागची म्हणाले होते की, पवित्र गुरुद्वारावरील हल्ल्याच्या वृत्ताने आम्ही खूप चिंतित आहोत.

या हल्ल्यामागे इसिस खोरासानचा हात आहे
काबूलमधील गुरुद्वारावरील हल्ल्यामागे ISIS खोरासानचा हात असल्याचे सांगण्यात येत आहे. हा हल्ला सकाळी 7.15 वाजता (भारतीय वेळेनुसार 8.30 वाजता) झाला. हल्ल्याच्या वेळी गुरुद्वारामध्ये 25-30 अफगाण हिंदू आणि शीख सकाळच्या प्रार्थनेसाठी उपस्थित होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com