''आम्हाला लोकशाहीवर लेक्चर देऊ नका, आधी...'', राज्यसभा उपाध्यक्ष हरिवंश संयुक्त राष्ट्रात पाकिस्तानवर बरसले

Rajya Sabha Vice President Harivansh: भारताचे प्रतिनिधीत्व करत असलेले राज्यसभेचे उपाध्यक्ष हरिवंश यांनी पाकिस्तान हा दहशतवादाची फॅक्टरी असल्याचे म्हटले.
Rajya Sabha Vice President Harivansh
Rajya Sabha Vice President HarivanshDainik Gomantak
Published on
Updated on

India Slams Pakistan:

पाकिस्तान काश्मीरच्या मुद्यावरुन भारतावर निशाणा साधण्याची एकही संधी सोडत नाही. भारत काश्मीरमध्ये कशाप्रकारे अत्याचार करत आहे, याच्या रंजक कहाण्या पाकिस्तान सातत्याने सांगत आला आहे. यातच आता, संयुक्त राष्ट्र संघाच्या जिनिव्हा पार्लमेंटरी युनियन (IPU) च्या बैठकीत भारताने पाकिस्तानचा चांगलाच समाचार घेतला.

भारताचे प्रतिनिधीत्व करत असलेले राज्यसभेचे उपाध्यक्ष हरिवंश यांनी पाकिस्तान हा दहशतवादाची फॅक्टरी असल्याचे म्हटले. हरिवंश म्हणाले की, भारताला लोकशाहीवर लेक्चर देण्याऐवजी इस्लामाबादने जम्मू-काश्मीरमध्ये सीमेपलीकडून हल्ले करणाऱ्या दहशतवाद्यांचा बिमोड करावा. यासोबतच, त्यांनी जम्मू-काश्मीर हा भारताचा अविभाज्य भाग आहे आणि राहील याचा पुनरुच्चार केला. आयपीयूच्या 148 व्या बैठकीत राज्यसभेचे उपाध्यक्ष हरिवंश बोलत होते.

दरम्यान, पाकिस्तानने भारतावर केलेले आरोप हरिवंश यांनी फेटाळून लावले. हरिवंश म्हणाले की, "लोकशाहीचा खराब ट्रॅक रेकॉर्ड असलेल्या देशाने आम्हाला लेक्चर देणे हे हास्यास्पद आहे. पाकिस्तानने अशा आरोपांसह IPU सारख्या मंचाचे महत्त्व कमी केले नसते तर बरे झाले असते.'' ते पुढे म्हणाले की, ''भारत हा जगातील सर्वात मोठी लोकशाही असलेला देश आहे. जगातील अनेक देशांनी भारतीय लोकशाहीला अनुकरणीय मॉडेल मानले आहे.''

Rajya Sabha Vice President Harivansh
United Nations: भारताच्या लढ्याला अखेर यश! या 'नकोश्या' यादीतून यूएन ने हटवले नाव

''जम्मू-काश्मीर हा भारताचा अविभाज्य भाग''

दुसरीकडे, हरिवंश यांनी काश्मीरच्या मुद्यावरुन पाकिस्तानवर निशाणा साधला. हरिवंश म्हणाले की, ''जम्मू आणि काश्मीर आणि लडाख केंद्रशासित प्रदेश भारताचा अविभाज्य भाग आहे. पाकिस्तानचा प्रोपोगंडा ही वस्तुस्थिती बदलू शकत नाही. त्याऐवजी, पाकिस्तानने त्यांच्या देशातील दहशतवाद्यांचे कारखाने बंद करावेत. पाकिस्तान सातत्याने मानवी हक्कांचे समर्थन करण्याचा दावा करतो. दुसरीकडे मात्र, पाकिस्तानस्थित दहशतवादी जम्मू-काश्मीरमध्ये सीमापार दहशतवादी हल्ले घडवून आणतात.''

Rajya Sabha Vice President Harivansh
India-Pakistan Relations: ''भारतासोबत पुन्हा व्यापार सुरु करा'', पाकिस्तानात होऊ लागली मागणी; नव्या सरकारमधील मंत्र्यानेही दिले संकेत

आपल्या भाषणादरम्यान हरिवंश यांनी आयपीयू सदस्यांना आठवण करुन दिली की, पाकिस्तानचा दहशतवाद्यांना आश्रय देण्याचा, मदत करण्याचा आणि सक्रियपणे पाठिंबा देण्याचा इतिहास राहिला आहे. ते पुढे म्हणाले की, "जागतिक दहशतवादाचा चेहरा ओसामा बिन लादेन हा पाकिस्तानमध्ये सापडला. पाकिस्तानने सर्वाधिक दहशतवाद्यांना आश्रय दिला आहे, ज्यांच्यावर संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेने बंदी घातली आहे. मला विश्वास आहे की, इस्लामाबाद आपल्या लोकांच्या कल्याणासाठी योग्य धडा घेईल.''

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com