भारत अफगाण दोस्ताना कायम: तिसरी गहू खेप अफगाणला रवाना

परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची यांनी दिली माहिती
India sent another shipment of 3000 MTs of wheat to Afghanistan
India sent another shipment of 3000 MTs of wheat to AfghanistanDainik Gomantak
Published on
Updated on

भारत अफगाण दोस्ताना कायम, भारताचा पारंपारिक विरोधक पाकिस्तान असला तरी भारताने अफगाणिस्तानशी परराष्ट्र संबंध अधिक चांगले कसे राहतील, यावर कायम भर दिला आहे. या पार्श्वभूमीवर मानवतावादी मदत पुरविण्यासाठी भारताने अफगाणसाठी मदतीचा पुढे केल्याचे आणखी एक उदाहरण समोर ठेवत भारताने तिसरी गहू खेप अफगाणिस्तानच्या जलालाबादला पाठवली आहे. ( India send third consignment of wheat to Afghanistan via Pak )

India sent another shipment of 3000 MTs of wheat to Afghanistan
बांग्लादेशाला प्रगतीपथावर नेणारा अन् चिनी कंपनीने बनवलेला 'पद्मा पुल' 7 वर्षांनंतर तयार

याबाबत परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची यांनी ट्विट करत ही माहिती दिली आहे. ते म्हणाले की, "अफगाण लोकांना पाठिंबा देण्याचा आमचा अथक प्रयत्न सुरूच आहे. आज, 2000 मेट्रिक टन गहू घेऊन भारताच्या मानवतावादी मदतीसाठीची तिसरी खेप अफगाणिस्तानच्या जलालाबादला रवाना झाली आहे.

ते पुढे म्हणाले की, अफगाणसाठी मदत "हा भारताच्या 50,000 मेट्रिक टन गव्हाच्या वचनबद्धतेचा एक भाग आहे अफगाणिस्तानमधील संयुक्त राष्ट्र जागतिक अन्न कार्यक्रमाद्वारे राबवला जात आहे, यापुर्वी भारताने 7 ऑक्टोबर रोजी 50,000 टन गहू पाकिस्तानमार्गे अफगाणिस्तानच्या लोकांना पाठवण्याच्या सुविधेसाठी प्रस्ताव पाठवला होता. त्याला 24 नोव्हेंबर रोजी इस्लामाबादकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला. त्यामूळे भारत सरकारने सकारात्मक प्रतिसाद देत हा निर्णय घेतला असल्याचं ही ते यावेळी म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com