Economic Corridor: मोठी बातमी! भारत - मध्य पूर्व युरोप कनेक्टिव्हिटी कॉरिडॉर लवकरच सुरू होणार, G20 त महत्वाची घोषणा

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी शनिवारी या आर्थिक कॉरिडॉरची घोषणा केली.
India-Middle East-Europe mega economic corridor
India-Middle East-Europe mega economic corridor
Published on
Updated on

India-Middle East-Europe mega economic corridor: भारत आणि मध्य पूर्व युरोप कनेक्टिव्हिटी कॉरिडॉर लवकरच सुरू होणार आहे. भारत, UAE, सौदी अरेबिया, EU, फ्रान्स, इटली, जर्मनी आणि अमेरिका यांचा समावेश असलेल्या कनेक्टिव्हिटी आणि पायाभूत सुविधांवरील सहकार्यासाठी हा एक महत्वाचा प्रकल्प असेल.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी शनिवारी या आर्थिक कॉरिडॉरची घोषणा केली. मजबूत कनेक्टिव्हिटी आणि पायाभूत सुविधा विकासाचा महत्वाचा आधार आहे. भारताने याला सर्वोच्च प्राधान्य दिले आहे. असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.

भारत मध्य पूर्व युरोप कनेक्टिव्हिटी कॉरिडॉर लॉन्च कार्यक्रमादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन, सौदी अरेबियाचे क्राउन प्रिन्स मोहम्मद बिन सलमान, इटलीचे पंतप्रधान ज्योर्जिओ मेलोनी आणि इतर नेते उपस्थित होते.

'मी पंतप्रधानांचे आभार मानू इच्छितो. एक पृथ्वी, एक कुटुंब, एक भविष्य ही संकल्पना या जगात खरच शक्य आहे. शाश्वत, लवचिक पायाभूत सुविधा निर्माण करणे, दर्जेदार पायाभूत सुविधांमध्ये गुंतवणूक करणे आणि आम्ही चांगले भविष्य घडवण्यासाठी आर्थिक कॉरिडॉर तयार करु.' असे अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन इकॉनॉमिक कॉरिडॉरची घोषणा करताना म्हणाले.

India-Middle East-Europe mega economic corridor
'बंदूक आणि स्फोटकांची ऑटो प्रगती मैदानाकडे जातेय' G20 च्या पार्श्वभूमीवर एका ट्विटमुळे दिल्ली पोलिसांची धावपळ

चीनच्या महत्त्वाकांक्षी बेल्ट अँड रोड इनिशिएटिव्हला (BRI) विरोध करण्याच्या उद्देशाने भारत, अमेरिका, सौदी अरेबिया आणि युरोपियन युनियनने शनिवारी G20 शिखर परिषदेच्या बाजूला बहुराष्ट्रीय रेल्वे आणि बंदर कराराची घोषणा केली.

दिल्लीत सुरू असलेल्या G-20 बैठकीचे मुख्य आकर्षण हा मेगा संयुक्त पायाभूत सुविधा करार होता. या कराराची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन, सौदीचे क्राऊन प्रिन्स मोहम्मद बिन सलमान आणि युरोपियन युनियनच्या नेत्यांनी केली.

या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचे उद्दिष्ट भारत, मध्य पूर्व तसेच युरोपमधील व्यापाराला चालना देणे आणि त्या प्रदेशांना जोडण्यासाठी आधुनिक स्पाइस रूट स्थापित करणे आहे. ज्यांना याचा फायदा होईल ते जागतिक अर्थव्यवस्थेच्या सुमारे एक तृतीयांश असतील. यामुळे भारत आणि युरोपमधील व्यापार 40 टक्क्यांनी वाढेल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com