भारत-चीनची ताकद झाली कमी तर, अमेरिका अव्वल स्थानी

कोरोना महामारीमुळे (Corona Epidemic) आशियातील भारत (India) आणि चीन (China) या दोन मोठ्या शक्तींचा हिंदी आणि प्रशांत महासागरातील प्रभाव कमी झाला आहे.
America
AmericaDainik Gomantak
Published on
Updated on

कोरोना महामारीमुळे (Corona Epidemic) आशियातील भारत (India) आणि चीन (China) या दोन मोठ्या शक्तींचा हिंदी आणि प्रशांत महासागरातील प्रभाव कमी झाला आहे. ऑस्ट्रेलियाच्या लोवी इन्स्टिट्यूटने आपल्या अहवालात हा दावा केला आहे. या अहवालानुसार, भारत आणि चीनचा बाह्य जगामध्ये आणि त्यांच्या प्रदेशातही प्रभाव कमी झाला आहे. तर दुसरीकडे अमेरिकेने (America) आपल्या राजनैतीक कूटनीतीच्या माध्यमातून आपली पकड मजबूत केली आहे. या भागातील देशांवर त्याचा प्रभाव वाढला आहे.

अहवालात नेमकं काय आहे

द लोवी इन्स्टिट्यूटने एशियन पॉवर इंडेक्स 2021 हा अहवाल प्रसिद्ध केला आहे. यात चीनबद्दल एक महत्त्वाची टिप्पणी आहे. अहवालात म्हटले आहे - महामारीनंतर चीन अनेक समस्यांनी ग्रस्त झाला आहे. तसेच राजनैतिक आणि आर्थिक आघाडीवर तो एकाकी पडला असून हेच त्याच्या मागे पडण्याचे कारण आहे. भारत ही या क्षेत्रातील चौथी मोठी शक्ती आहे. अमेरिका, जपान आणि चीन येथे आधीच उपस्थित आहेत. कोरोना संसर्गापूर्वीही चीनचा ग्रोथ रेट कमालीचा खलावला होता. त्याचा राजनैतिक आणि आर्थिक प्रभावही एका वर्षात कमी झाला आहे. मात्र, याआधीही भारत चौथ्या स्थानावर होता आणि आजही आहे.

America
सोशल मीडिया 'लोकशाहीसाठी धोकादायक': तुर्की राष्ट्राध्यक्ष

अमेरिकेने वेग घेतला

आशियाई शक्तींची मजबूत उपस्थिती असूनही, इंडो-पॅसिफिक प्रदेशात अमेरिकेचा प्रभाव पुन्हा वेगाने वाढला आहे. याचे कारण म्हणजे जो बायडन प्रशासनाची भक्कम मुत्सद्देगिरी. महामारीतून सावरल्यानंतर अमेरिकेने झपाट्याने सुधारणा केली आहे. आर्थिकदृष्ट्याही वेग वाढला आहे. डोनाल्ड ट्रम्प यांच्या नेतृत्वात हे काम अवघड वाटत होते. निर्देशांकाच्या आठ पैकी सहा पॉइंट्समध्ये अमेरिका सर्वात मजबूत आहे.

अहवालानुसार भारत अजूनही अमेरिकेवर फारसा अवलंबून नाही. असे असूनही, तो लष्करी आणि सामरिक दृष्टिकोनातून चीनला खडतर आव्हान देत आहे.

लढाई होण्याचा धोका

अहवालात पुढे म्हटले आहे - या भागात अशा अनेक गोष्टी आहेत ज्या सुरक्षेशी संबंधित आहेत. त्यामुळे काही प्रमाणात युध्द होण्याचा धोका आहे. अमेरिकेसमोर चीनचे आव्हान आहे. महामारीचा प्रभाव भारत आणि जपानवर अधिक झाला आहे. भारताला पाहिजे तितके सावरता आलेले नाही. चीनशी बरोबरी करायला भारताला जाऊ द्यावा लागणार आहे. जपानकडे कमी संसाधने असतानाही त्यांनी त्यांचा उत्तम वापर केला.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com