पाकिस्तानी वंशाच्या व्यक्तीची क्रूरता; पत्नी, सासू अन् 4 वर्षाच्या मुलीची केली हत्या

अमेरिकेतील (America) टेक्सास राज्यात पाकिस्तानी वंशाच्या व्यक्तीने पत्नी, चार वर्षांची मुलगी आणि सासूची गोळ्या झाडून हत्या केली.
Crime
CrimeDainik Gomantak
Published on
Updated on

अमेरिकेतील टेक्सास राज्यात पाकिस्तानी वंशाच्या व्यक्तीने पत्नी, चार वर्षांची मुलगी आणि सासूची गोळ्या झाडून हत्या केली. या घटनेची माहिती पोलिस आणि मीडिया रिपोर्ट्समधून प्राप्त झाली आहे. हॅरिस काउंटी शेरीफ एड गोन्झालेझ यांनी सांगितले की, गुरुवारी पहाटे गोळीबार झाल्याचे वृत्त मिळाल्यानंतर पोलिस अधिकाऱ्यांनी चॅम्पियन फॉरेस्ट भागातील व्हिंटेज पार्क अपार्टमेंट कॉम्प्लेक्स ( Crimes in the US) मध्ये प्रवेश केला. यादरम्यान घरात चार लोक मृतावस्थेत आढळले. त्या व्यक्तीच्या मृतदेहाजवळ सेमी ऑटोमॅटिक शॉटगन सापडल्याचे त्यांनी सांगितले. (In the US state of Texas a man of Pakistani descent shot and killed his wife four-year-old daughter and mother in law)

एड गोन्झालेझ यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे की, 'प्रथमदर्शनी पत्नीला मारण्यासाठी अज्ञात व्यक्ती घरी गेल्याचे दिसते. त्यानंतर तिथे त्याने पत्नी, चार वर्षांची मुलगी आणि सासूची गोळ्या झाडून हत्या केली. त्यानंतर त्याने स्वत:वरही गोळी झाडली. घटनास्थळी चार मृतदेह सापडले असून तिथून एक पिस्तूलही जप्त करण्यात आले आहे. हे कुटुंब मूळचे दक्षिण आशियातील (South Asia) होते. एड गोन्झालेझच्या म्हणण्यानुसार, 'ते घटस्फोट घेणार होते, पती-पत्नी दोघेही वेगळे राहत होते.'

Crime
Balochistan:'...ले के रहेंगे आझादी,' बलुच फुटीरतावाद्यांचा निशाणा बनतायेत चीनी लोक

पोलिसांनी त्यांची नावे उघड केली नाहीत

स्थानिक पोलिसांनी (Police) अद्याप त्यांची नावे जाहीर केलेली नाहीत. परंतु मृतांची ओळख सादिया मंजूर, मुलगी खदिजा मोहम्मद आणि आई इनायत बीबी अशी केली आहे. इस्लामिक सोसायटी ऑफ ग्रेटर ह्यूस्टनने त्यांच्या अंत्यसंस्काराची व्यवस्था केली. मोहम्मद असे या व्यक्तीचे नाव आहे. सादिया ह्यूस्टन पीस अकादमीमध्ये शिक्षिका होती. तिला इस्लामिक सोसायटी ऑफ ग्रेटर ह्यूस्टनच्या स्मशानभूमीत दफन करण्यात आले आहे.

Crime
इम्रान खान सरकार लवकरच बलुच बंडखोरांशी करणार चर्चा !

काही दिवसांपूर्वी अशी बातमी आली होती की, अमेरिकेच्या (America) फेडरल ज्युरीने पाकिस्तानी वंशाच्या एका अमेरिकन कुटुंबाला पाकिस्तानी महिलेला 12 वर्षे सक्तीने मजुरी केल्याप्रकरणी दोषी ठरवले आहे. फेडरल ज्युरीने कुटुंबातील सदस्य झाहिदा अमान, मोहम्मद नोमान चौधरी आणि मोहम्मद रेहान चौधरी यांना पीडितेचा 12 वर्षांहून अधिक काळ शारीरिक आणि मानसिक छळ केल्याबद्दल दोषी ठरवले आहे. या प्रकरणातील दोषींना 5 ते 20 वर्षांपर्यंत तुरुंगवासाची शिक्षा होऊ शकते. एका प्रसिद्धीपत्रकानुसार, 'पीडित महिलेचा पाकिस्तानी-अमेरिकन कुटुंबाने मानसिक आणि शारिरीक छळ केला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com