स्पेन मध्ये मिळणार 3 दिवस मासिक पाळीची रजा

दर महिन्याला तीन दिवसांची सुट्टी असू शकते, तर स्पॅनिश सरकार या निर्णयावर लवरकच शिक्कामोर्तब करणार आहे.
Menstruation
MenstruationDainik Gomantak
Published on
Updated on

मासिक पाळीदरम्यान (Menstruation) महिन्याच्या त्या चार पाच दिवसांमध्ये महिलांना तीव्र वेदना सहन कराव्या लागतात. अनेकदा या वेदनांमुळे त्यांच्या व्यावसायिक आणि वैयक्तिक आयुष्यावरही परिणाम होतो. मासिक पाळीतील होणाऱ्या वेदनांमुळे महिलांना मासिक पाळीची सुट्टी देणारा स्पेन हा पहिला पाश्चात्य देश बनणार आहे. ही सुट्टी दर महिन्याला तीन दिवसांची सुट्टी असू शकते तर स्पेनच्या कॅडेना सेर रेडिओ स्टेशननुसार, स्पॅनिश सरकार या निर्णयावर लवरकच शिक्कामोर्तब करणार आहे. (In Spain women will get 3 days Menstruation leave)

Menstruation
Healthy Tips: उन्हाळ्यात त्वचा अन् केसांसाठी जांभूळ लाभदायी

जपान, दक्षिण कोरिया, इंडोनेशिया आणि झांबियासारख्या इतर देशांनी महिलांसाठी मासिक पाळीच्या सुट्टीला आधीच मान्यता दिली आहे. मंगळवारी होणाऱ्या स्पेनच्या (Spain) पुढील मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजूर होणाऱ्या या सुधारणा पॅकेजअंतर्गत शाळांमधील गरजू मुलींसाठी सॅनिटरी पॅडची व्यवस्था करावी लागणार आहे. 3 मार्च रोजी समानता आणि लैंगिक हिंसा विरुद्ध राज्य सचिव अँजेला रॉड्रिग्ज यांनी पॅकेजची घोषणा केली होती.

रॉड्रिग्ज यांनी जाहीर केलेल्या

पॅकेजमध्ये मासिक पाळी आरोग्य आणि पुनरुत्पादक आरोग्याची हमी समाविष्ट करण्यात आली होती. तर त्यात गर्भपात झालेल्या महिलांच्या रजेचाही समावेश होता. रॉड्रिग्ज म्हणाले की मासिक पाळीच्या आरोग्याबाबतच्या अधिकारांवर कधीही चर्चा होत नाही आणि त्याची आकडेवारी देखील धक्कादायक आहे. आर्थिक कारणांमुळे चार महिलांपैकी एक महिला स्वच्छता उत्पादने खरेदी करू शकत नाही, म्हणूनच त्यांना शैक्षणिक आणि सामाजिक केंद्रांमध्ये मोफत स्वच्छता उत्पादने देण्याचा आमचा प्रस्ताव आहे.

Menstruation
आठवड्यातून एकदा करा Watermelon Facial आणि चेहरा बनवा चमकदार!

'वेदना म्हणजे तीव्र वेदना, अस्वस्थता नाही'

मासिक पाळीच्या रजेचा उद्देश हा ज्या महिलांना मासिक पाळीदरम्यान वेदना होतात त्यांना आराम मिळावा. मासिक पाळीदरम्यानच्या तीव्र वेदनांना डिसमेनोरिया म्हणतात. रॉड्रिग्ज म्हणाले की हे स्पष्ट करणे फार महत्वाचे आहे की वेदना म्हणजे अस्वस्थता नसते. याचा अर्थ तीव्र वेदना, डोकेदुखी आणि ताप असाही असतो असंही यावेळी रॉड्रिग्ज म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com