कोरोना महामारीमुळे जगभरात थैमान माजले आहे. दरम्यान अनेक देश कोरोना वरील निर्बंध शिथिल करत आहेत. फ्रान्समध्ये येणाऱ्या प्रवाशांसाठी कोविड चाचणी घेण्याची अनिवार्य अट रद्द करण्यात आली आहे. एका सरकारी निवेदनात म्हटले आहे की, शनिवारपासून केवळ लसीकरणाचा पुरावा फ्रान्समध्ये (France) येण्यासाठी पुरेसा असेल. इथे प्रवासी कुठल्या देशातून येत आहेत याची पर्वा न करता, ओमिक्रॉन विषाणुचा प्रसार होण्यापूर्वीची परिस्थिती प्रवाशासाठी पूर्ववत झाल्याचे सरकारकडून सांगण्यात आले आहे.
* फ्रान्समधील प्रवाशांसाठी कोविड नियमांमध्ये शिथिलता
फ्रेंच सरकारने म्हटले आहे की, बहुतेक देशांमध्ये ओमिक्रॉन विषाणुमुळे साथीच्या रोगाचा उद्रेक होत आहे. मात्र लसीकरण मोहीमही जोरात सुरू आहे. मोठ्या प्रमाणात लोकांचे लसीकरण केले जात आहे. अशा स्थितीत प्रवशानी केवळ लस घेणे आवश्यक आहे. आता कोणत्याही प्रकारची कोविड चचणी केली जाणार नाही. मात्र, ज्या प्रवाशांनी अद्याप लसीकरण (Vaccination) केलेले नाही, त्यांची कोविड चाचणी (Corona Test) करावी लागेल, असेही सरकारकडून सांगण्यात आले आहे.
* लस न घेणाऱ्या प्रवशाची चाचणी केली जाईल
फ्रान्स सरकारच्या एका निवेदनात असे म्हंटले आहे की, ज्या प्रवाशानी लस घेतलेली नाही त्यांनी कोविड निगेटिव्ह चाचणीचा अहवाल दाखवणे बंधनकारक आहे. तसेच ग्रीन लिस्ट देशांतील प्रवाशांना आगमन झाल्यावर अलग ठेवण्याची गरज नाही. त्याच वेळी, ऑरेंज लिस्ट देशांतील प्रवाशांची चाचणी घ्यावी लागेल. डिसेंबरमध्ये ओमिक्रॉन विषाणुचा झपाट्याने प्रसार झाल्यानंतर, फ्रान्समध्ये संसर्ग टाळण्यासाठी चाचणी अनिवार्य करण्यात आली. फ्रान्समध्ये 2 फेब्रुवारीपासून कोविड निर्बंध हळूहळू काम करू लागले आहेत. पहिल्या टप्प्यात कॉन्सर्ट हॉल, क्रीडा आणि इतर कार्यक्रमासाठी प्रेक्षक क्षमता मर्यादा 2 फेब्रुवारीपासून रद्द करण्यात आली आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.