काँगोमध्ये बंडखोरांनी पाडले संयुक्त राष्ट्रांचे हेलिकॉप्टर; सहा पाकिस्तानी ठार

काँगोमध्ये संयुक्त राष्ट्रांच्या (United Nations) शांतता मोहिमेसाठी जात असताना त्यावर बंडखोरांनी हल्ला केला.
Congo
CongoDainik Gomantak
Published on
Updated on

देशाच्या पूर्वेकडील भागात बंडखोरांनी मंगळवारी आठ शांतीरक्षक आणि संयुक्त राष्ट्रांच्या निरीक्षकांना घेऊन जाणारे हेलिकॉप्टर पाडले असून या घटनेत कोणीही वाचले नसल्याचे डेमोक्रॅटिक रिपब्लिक ऑफ काँगोच्या (Congo) लष्कराने सांगितले आहे. मृत्युमुखी पडलेल्या आठ शांती सैनिकांपैकी सहा पाकिस्तानी आहेत. काँगोच्या लष्करी निवेदनानुसार, हेलिकॉप्टर (Helicopter) दुसर्‍या हेलिकॉप्टरसह काँगोमध्ये संयुक्त राष्ट्रांच्या (United Nations) शांतता मोहिमेसाठी जात असताना त्यावर बंडखोरांनी हल्ला केला.

दरम्यान, बंडखोर गटाकडून करण्यात आलेल्या हल्ल्याचे मूल्याकंन संयुक्त राष्ट्राच्या शांतीसेनेचे सैनिक करत आहेत. एका निवेदनानुसार, M23 या बंडखोर गटाने सोमवारी त्चांजू, रुन्योनी, नदिजा आणि त्चेंगग्रेरोसह अनेक गावांवर हल्ला केला. संयुक्त राष्ट्राचे प्रवक्ते स्टीफन दुजारिक यांनी नंतर सांगितले की, 'शोध आणि बचाव मोहिमेमधून कोणीही वाचले नसल्याचे समोर आले आहे.'

Congo
Saudi-led coalition announces Yemen ceasefire : सौदी थांबवणार रमजानच्या काळात येमेनमधील लष्करी कारवाया

आठ जणांचे मृतदेह गोमात आणले

पूर्व काँगोमधील सर्वात मोठे शहर असलेल्या गोमामधून आठ जणांचे मृतदेह आणण्यात आले आहेत. "आम्ही सहा पाकिस्तानी क्रू मेंबर्स, रशिया आणि सर्बियातील दोन लष्करी कर्मचार्‍यांच्या कुटुंबियांबद्दल आणि त्यांच्या देशांच्या सरकारांप्रती शोक व्यक्त करतो," असे दुजारिक म्हणाले. अपघाताच्या परिस्थितीचा युध्दपातळी तपास सुरु आहे.

Congo
Yemen Houthis दहशतवादी हल्ल्यातबाबत UAEने केले पहिले विधान

विस्थापित लोकांच्या छावणीवर हल्ला झाला

मागील महिन्याच्या सुरुवातीला, कॉंगोमधून असे वृत्त आले होते की, पूर्वेकडील इटुरी राज्यात सुरु असलेल्या हिंसाचारामुळे विस्थापित झालेल्या लोकांच्या छावणीवर बंडखोरांनी हल्ला करुन 60 लोक मारले होते. स्थानिक अधिकाऱ्यांनी बुधवारी ही माहिती दिली. शिबिराचे प्रमुख, नदालो बुड्झ यांनी सांगितले की, कोडेको (Kodeko) म्हणून ओळखल्या जाणार्‍या गटातील सैनिक जुगू येथील विस्थापितांच्या शिबिरात आले आणि त्यांनी बऱ्याच लोकांना ठार केले. पुढे त्यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले की, 'छावणीतील 60 लोकांना चाकू आणि इतर धारदार शस्त्रांनी मारण्यात आले.' स्थानिक प्रशासकीय अधिकाऱ्यांनीही याला दुजोरा दिला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com