Pakistan: इम्रान खान राजकीय खेळपट्टीवर 'क्लीन बोल्ड'; पंतप्रधान पदावरून पायउतार

नवे सरकार सूडाचे राजकारण करणार नाही : शाहबाज
Imran Khan
Imran KhanDainik Gomantak
Published on
Updated on

इम्रान खान अखेर राजकीय खेळपट्टीवर 'क्लीन बोल्ड' झाले. त्यांचा अविश्वास प्रस्तावावरील मतदान पुढे ढकलण्याचा प्रत्येक प्रयत्न अयशस्वी ठरला. शनिवारी मध्यरात्री पाकिस्तान संसदेत झालेल्या मतदानात अविश्वास ठराव मंजूर करण्यात आला. पराभवानंतर इम्रान रात्री उशिरा पंतप्रधान निवसातून बाहेर पडले. संसदेत अविश्वास ठरावादरम्यान त्यांच्या विरोधात 174 मते पडली. यावेळी इम्रान आणि त्यांच्या पक्षाचे खासदार सभागृहात अनुपस्थित होते. (Imran Khan looses no trust vote in Pakistan National Assembly)

Imran Khan
ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन युक्रेनमध्ये दाखल, झेलेन्स्की यांची घेतली भेट

तत्पूर्वी, पीएमएल-एन नेते शेहबाज शरीफ यांच्या नेतृत्वाखालील विरोधकांच्या प्रचंड दबावामुळे आणि सर्वोच्च न्यायालयाने दुपारी 12:30 वाजता सुनावणी घेण्याची तयारी केल्यामुळे संसदेचे सभापती असद कैसर आणि उपसभापती कासिम सूरी यांनी राजीनामा दिला. दोघांनीही आपले राजीनामे प्रभारी पीठासीन अधिकारी अयाज सादिक यांच्याकडे सुपूर्द केले. विरोधी पक्ष पीएमएल-एनचे सदस्य सादिक यांनी मतदानाची प्रक्रिया सुरू केली तेव्हा इम्रान खान (Imran Khan) यांच्या पक्ष पीटीआयच्या सदस्यांनी सभात्याग केला. सत्ताधाऱ्यांच्या अनुपस्थितीत दुपारी 12.40 च्या सुमारास अविश्वास ठराव मंजूर करण्यात आला.

Imran Khan
"अजिबात खरं नाही": अमेरिकेने फेटाळला इम्रान खान यांनी केलेला दावा

पीएमएल-एनचे नेते शाहबाज शरीफ हे नवे पंतप्रधान होऊ शकतात. अविश्वास ठराव जिंकल्यानंतर शाहबाज म्हणाले, आजपासून पाकिस्तानसाठी (Pakistan) नवी पहाट होईल. पाकिस्तान मुस्लिम लीग-नवाजचे अध्यक्ष शाहबाज शरीफ हे त्यांचे संयुक्त उमेदवार असतील, असे संयुक्त विरोधी पक्षाने आधीच जाहीर केले होते. अयाज सादिक म्हणाले की, नवीन पंतप्रधानांसाठी रविवारी दुपारी 2 वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज सादर करता येतील.

नवे सरकार सूडाचे राजकारण करणार नाही : शाहबाज
शाहबाज म्हणाले की, बिलावल आणि मौलाना फजलूरसोबत मिळून देश चालवतील. कोणाचाही सूड घेणार नाही आणि कोणावर अत्याचार करणार नाही. नवीन सरकार (Government) सूडाचे राजकारण करणार नाही, असा निर्धार करा. विश्वासदर्शक ठरावाच्या घोषणेनंतर शाहबाज म्हणाले, 'मला भूतकाळातील कटुतेकडे परत जायचे नाही. हे विसरून पुढे जावे लागेल. आम्ही कोणताही सूड किंवा अन्याय करणार नाही. आम्ही कुणालाही विनाकारण तुरुंगात पाठवणार नाही.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com