Geeta Gopinath
Geeta GopinathDainik Gomantak

IMF चीफ इकॉनॉमिस्ट गीता गोपीनाथ यांना मिळाली मोठी बढती

गीता गोपीनाथ (Geeta Gopinath) पुढील महिन्यात जेफ्री ओकामोटो यांची जागा घेतील.
Published on

IMF अर्थात आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या हाय-प्रोफाइल चीफ इकॉनॉमिस्ट गीता गोपीनाथ (Geeta Gopinath) यांना संस्थेतील क्रमांक दोन अधिकारी पदावर बढती देण्यात आली आहे. IMF ने गुरुवारी जाहीर केले की, गीता गोपीनाथ पुढील महिन्यात जेफ्री ओकामोटो (Geoffrey Okamoto) यांची जागा घेतील. त्या आता पहिल्या उपव्यवस्थापकीय संचालक बनतील. आयएमएफच्या प्रमुख क्रिस्टालिना जॉर्जिव्हा (Kristalina Georgieva) यांच्यानंतर गीता गोपीनाथ या पहिल्या क्रमांकावर असतील. वॉशिंग्टनस्थित या आंतरराष्ट्रीय संघटनेत पहिल्या दोन पदांवर महिला बसण्याची ही पहिलीच वेळ असेल. या नेतृत्वाच्या भूमिकेसाठी जॉर्जिव्हा यांनी गोपीनाथचे वर्णन 'योग्य वेळी योग्य व्यक्ती' असे केले आहे.

Geeta Gopinath
ऑस्ट्रेलियन संसदेला काळीमा,निवडून आलेल्या अनेक प्रतिनिधींचा संसदेतच लैंगिक छळ

दरम्यान, त्यांच्या नियुक्तीची घोषणा IMF प्रमुखांनी केली होती, ज्यामध्ये ते म्हणाले होते की '..विशेषतः जेव्हा महामारीमुळे आपल्या सदस्य देशांसमोरील बृहत आर्थिक आव्हाने मोठी आहेत. तेव्हा आम्हाला माहीती आहे की, गीता ज्यांची जगातील सर्वोच्च मॅक्रोइकॉनॉमिस्ट म्हणून ओळख आहे. आमच्या पहिल्या उपव्यवस्थापकीय संचालकामध्ये आपल्याला जे हवे आहे ते त्यांच्याकडे आहे. या पदावर निवड झाल्यानंतर, गीता गोपीनाथ यांनी ट्विटरवर केलेल्या ट्विटमध्ये या नियुक्तीबद्दल कृतज्ञता व्यक्त केली असून महामारीच्या आव्हानांचा सामना करण्याची वचनबद्धता व्यक्त केली.

तसेच, गीता गोपानिथ ऑक्टोबर 2018 मध्ये IMF च्या मुख्य अर्थशास्त्रज्ञ बनल्या. पुढच्या वर्षी जानेवारीत त्या हार्वर्ड विद्यापीठात अध्यापन करण्यासाठी परतणार असल्याची चर्चा होती, परंतु आता या नियुक्तीमुळे त्या विद्यापीठामधील अध्यापनाची जबाबदारी सोडत असल्याचे स्पष्ट झाले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com