Egg Crisis In Russia: आयएम सॉरी! अंडी टंचाईपुढे पुतिन यांनी टेकले गुढगे, मागितली देशवासियांची माफी

Russia Eggs Shortage: या आकडेवारीच्या आधारे ब्लूमबर्गने सांगितले आहे की, या वर्षाच्या सुरुवातीपासून येथे अंड्याच्या किमतीत 42 टक्क्यांनी वाढ झाली आहे. अंडी खरेदीसाठी येथील दुकानांवर लांबच लांब रांगा लागल्या आहेत.
Egg Crisis In Russia|Putin
Egg Crisis In Russia|PutinDainik Gomantak

Im sorry! Putin apologized for the shortage of eggs in Russia:

युक्रेनसोबत दीर्घकाळ चाललेल्या युद्धात अडकलेल्या रशियाला आता अंड्यांचा तुटवडा जाणवत आहे. राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन आणि त्यांच्या सरकारवर या संदर्भात मोठ्या प्रमाणावर टीका होत आहे. येथे सणासुदीच्या वेळी बनवलेल्या अनेक खास पदार्थांमध्ये अंड्यांचा वापर केला जातो. त्यामुळे रशियात अंड्यांना मोठे महत्त्व आहे.

फेडरल स्टॅटिस्टिक्स सर्व्हिसच्या आकडेवारीनुसार चार आठवड्यात अंड्याच्या किमती चार टक्क्यांनी वाढल्या आहेत. या आकडेवारीच्या आधारे ब्लूमबर्गने सांगितले आहे की, या वर्षाच्या सुरुवातीपासून येथे अंड्याच्या किमतीत 42 टक्क्यांनी वाढ झाली आहे. अंडी खरेदीसाठी येथील दुकानांवर लांबच लांब रांगा लागल्या आहेत.

हा प्रश्न इथे इतका गंभीर झाला आहे की, पुतिन यांच्या नुकत्याच झालेल्या वार्ताहर परिषदेतही हा प्रश्न उपस्थित झाला होता.

वास्तविक, ख्रिसमस आणि नवीन वर्षासह सुट्टीचा हंगाम येणार आहे आणि यावेळी येथे बनवलेल्या अनेक पारंपारिक पदार्थांमध्ये अंडी हा मुख्य घटक आहे.

यासोबतच पुढील वर्षी मार्चमध्ये रशियात राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकाही होणार आहेत. अशा स्थितीत या निवडणुकीत अंडी पुतिन यांना धक्का देणार नाहीत ना, अशीही अटकळ बांधली जात आहे.

मात्र, या संकटाचा सामना करण्यासाठी सरकारने गेल्या बुधवारी मोठा निर्णय घेतला आणि आपल्या मित्र देशांकडून १.२ अब्ज अंड्यांच्या आयातीवरील शुल्क रद्द केले.

यामुळे देशांतर्गत बाजार समतोल राखण्यात आणि अंड्यांचा पुरवठा वाढण्यास मदत होईल, असे आर्थ मंत्रालयाने म्हटले होते. पुतिन यांनी या संकटासाठी सरकारला जबाबदार धरले होते आणि आयात शुल्क हटवण्यास उशीर झाल्याचे म्हटले होते.

देशात अशी परिस्थिती निर्माण झाल्याबद्दल त्यांनी माफी मागितली होती आणि लवकरच परिस्थिती सुधारण्याचे आश्वासनही दिले होते.

Egg Crisis In Russia|Putin
Video: 'ते आपल्या देशाच्या रक्तात विष मिसळत आहेत', ट्रम्प यांचे स्थलांतरितांविरोधात चिथावणीखोर वक्तव्य
Egg Crisis In Russia|Putin
कोरोनाचा JN.1 उप-प्रकार 50 टक्क्यांनी कमी करू शकतो अँटीबॉडीची पातळी, नव्या अभ्यासात खुलासा

दरम्यान रशियातील अंडी टंचाईची दृश्ये दाखवणारे अनेक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

यामध्ये रशियन नागरिक बाजारपेठेतील दुकानांबाहेर रांगा लागलेल्या दिसत आहेत, नागरिक तुलनेने स्वस्त अंड्यांचा मर्यादित साठा घेण्यासाठी सकाळी ७ वाजल्यापासून रांगेत उभे राहत आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com