Video: 'ते आपल्या देशाच्या रक्तात विष मिसळत आहेत', ट्रम्प यांचे स्थलांतरितांविरोधात चिथावणीखोर वक्तव्य

Donald Trump On Migrants : डोनाल्ड ट्रम्प म्हणाले की, 'ते (स्थलांतरित) केवळ दक्षिण अमेरिकाच नव्हे तर संपूर्ण जगाच्या तुरुंगात विष ओतत आहेत. ते आफ्रिका, आशिया आणि जगभरातून आपल्या देशात येतात.
Donald Trump
Donald TrumpDainik Gomantak
Published on
Updated on

'They are poisoning the blood of our country', Donald Trump's provocative statement against the Migrants:

अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा बेकायदेशीर स्थलांतरितांच्या विरोधात प्रक्षोभक विधान केले आहे. न्यू हॅम्पशायरमधील डरहम येथे एका रॅलीला संबोधित करताना ट्रम्प म्हणाले की, स्थलांतरित आपल्या देशाच्या रक्तात विष मिसळत आहेत.

याआधीही ट्रम्प यांनी स्थलांतरितांबाबत असेच विधान केले होते. ट्रम्प यांच्या या विधानावर जोरदार टीका होत असून, त्यांच्या या वक्तव्याचे 'श्वेत वर्चस्ववादी आणि नाझी मानसिकता' असे वर्णन केले जात आहे.

डोनाल्ड ट्रम्प म्हणाले की, 'ते (स्थलांतरित) केवळ दक्षिण अमेरिकाच नव्हे तर संपूर्ण जगाच्या तुरुंगात विष मिसळत आहेत. ते आफ्रिका, आशिया आणि जगभरातून आपल्या देशात येतात.

ट्रम्प यांनी गेल्या ऑक्टोबरमध्ये असेच प्रक्षोभक विधान केले होते, ज्यात त्यांनी अमेरिकन समाजातील एका वर्गाचे कीटक असे वर्णन केले होते. त्यांनी डावे आणि कट्टरतावादी विचारसरणीच्या लोकांचे कीटक असे वर्णन केले होते आणि त्यांना उखडून टाकण्याबद्दल बोलले होते.

राष्ट्राध्यक्ष जो बिडेन यांनीही ट्रम्प यांच्या विधानावर कडाडून टीका केली आणि ट्रम्प जी भाषा वापरत आहेत ती नाझी विचारसरणीची भाषा असल्याचे सांगितले होते.

Donald Trump
Libya च्या समुद्र किनाऱ्यावर स्थलांतरितांनी भरलेले जहाज बुडाले; लहान मुले आणि महिलांसह 61 जणांच्या मृत्यूची भीती

डोनाल्ड ट्रम्प यांनी 2020 च्या अध्यक्षीय निवडणुकीत आपला पराभव सहजासहजी स्वीकारला नव्हता नाही आणि आता ते पुन्हा एकदा 2024 च्या निवडणुकीत रिपब्लिकन पक्षाकडून मजबूत उमेदवार आहेत.

मीडिया रिपोर्ट्समध्ये असे म्हटले जात आहे की, जर डोनाल्ड ट्रम्प पुन्हा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष झाले तर यावेळी ते अवैध स्थलांतरितांसाठी पूर्वीपेक्षाही कठोर कायदे आणू शकतात.

Donald Trump
Flashback 2023: Gemini, Open AI API सह या 7 एआय टूल्सनी गाजवले यंदाचे वर्ष

गेल्या टर्ममध्ये ट्रम्प यांनी अवैध स्थलांतरितांना त्यांच्या मुलांपासून वेगळे केले होते. यावेळी ट्रम्प अवैध स्थलांतरितांना अटक करून त्यांना त्यांच्या देशात परत पाठवण्यासाठी कायदा आणणार असल्याची चर्चा आहे.

ट्रम्प यांनी अनेक मुस्लिम देश आणि आफ्रिकन देशांच्या नागरिकांना अमेरिकेत येण्यास बंदी घातली होती. सत्तेत आल्यानंतर पुन्हा एकदा ही बंदी लागू करणार असल्याचे ट्रम्प यांचे म्हणणे आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com