Iran Israel Tension: 'लेबनॉनवर हल्ला केल्यास विनाशासाठी तयार राहा', इराणची इस्रायलला खुली धमकी!

Iran Israel Tension: इस्त्रायल आणि हमास यांच्यातील युद्ध थांबण्याचं नाव घेत नाहीये. इस्त्रायल सातत्याने हमासशासित गाझासह अनेक शहरांवर हल्ले करत आहे.
Iran Israel Tension: 'लेबनॉनवर हल्ला केल्यास विनाशासाठी तयार राहा', इराणची इस्रायलला खुली धमकी!
Iran-Israel TensionsDainik Gomantak

इस्त्रायल आणि हमास यांच्यातील युद्ध थांबण्याचं नाव घेत नाहीये. इस्त्रायल सातत्याने हमासशासित गाझासह अनेक शहरांवर हल्ले करत आहे. तर दुसरीकडे, इस्रायल आणि हिजबुल्ला यांच्यातील तणावही वाढत चालला आहे. इस्रायलने लेबनीज सीमेवर सैन्य तैनात केले आहे. तणावाचे हे वातावरण कधीही युद्धात बदलू शकते.

दरम्यान, लेबनॉनवर हल्ला केल्यास इराण पूर्ण ताकदीने प्रत्युत्तर देईल, अशी धमकी इराणने इस्रायलला दिली आहे. इराणच्या यूएन मिशनने म्हटले की, लेबनॉनवर हल्ला झाल्यास खूप विनाशकारी युद्ध होईल.

दरम्यान, इस्रायलला प्रत्युत्तर देण्यासाठी सर्व मार्ग खुले असल्याचे इराणने म्हटले आहे. त्याला पूर्ण ताकदीने उत्तर दिले जाईल. इस्रायलने घोषणा केली की, गाझामधील सैन्य कमी करुन लेबनॉनच्या हिजबुल्लावर लक्ष केंद्रित करुन योग्य ते उत्तर दिले जाईल. गाझामध्ये युद्ध सुरु झाल्यानंतर लेबनॉनच्या सीमेवर सातत्याने गोळीबार सुरु आहे. येथे हिजबुल्लाचे (Hezbollah) लडाखे आणि इस्रायली लष्कराच्या सैनिकांमध्ये वारंवार चकमकी होत आहेत.

Iran Israel Tension: 'लेबनॉनवर हल्ला केल्यास विनाशासाठी तयार राहा', इराणची इस्रायलला खुली धमकी!
Israel Iran Tensions: आमची मुलं अशा शस्त्रांनी खेळतात... इराणच्या परराष्ट्रमंत्र्यांनी इस्रायलची उडवली खिल्ली; थेट तेल अवीववर हल्ला न करण्याचंही दिलं कारण!

नुकतेच इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी सांगितले की, ते हिजबुल्लावर पूर्ण ताकदीने हल्ला करण्यासाठी तयार आहेत. इस्रायलने दक्षिण लेबनॉनमध्ये अनेक ठिकाणी हिजबुल्लाच्या ठिकाणांवर क्षेपणास्त्र हल्ले केले. इस्रायली मीडियानुसार, लष्कराची विमाने हिजबुल्लाच्या ठिकाणी दिसली आहेत. इस्रायलचे (Israel) संरक्षण मंत्री योव गॅलंट यांनी सांगितले की, त्यांच्या देशाला हिजबुल्लाविरुद्ध युद्ध करायचे नसले तरी लष्कर त्यासाठी तयार आहे.

ते पुढे म्हणाले की, आमचा राजकीय समाधानावर विश्वास आहे. हा नेहमीच शांततेचा पर्याय राहिला आहे. गॅलंट पुढे म्हणाले की, अमेरिका आणि इस्रायल प्रत्येक परिस्थितीला तोंड देण्याची तयारी करत आहेत. हिजबुल्लाला हे देखील माहित आहे की, त्याचे परिणाम घातक असू शकतात आणि लेबनॉनमध्ये मोठा विध्वंस होऊ शकतो. त्याचवेळी, हिजबुल्ला प्रमुख हसन नसरल्लाह याने युद्ध झाले तेही योग्य प्रत्युत्तर देतील असे म्हटले आहे.

Iran Israel Tension: 'लेबनॉनवर हल्ला केल्यास विनाशासाठी तयार राहा', इराणची इस्रायलला खुली धमकी!
Israel Iran Tensions: ''...आम्ही तुमचा न्यूक्लियर प्लांट नष्ट करु''; संघर्षादरम्यान इराणची इस्त्रायलला खुली धमकी

दुसरीकडे, लेबनॉनमधील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर चीन, भारत, अमेरिका, जर्मनी, कॅनडा आणि नेदरलँडसारख्या अनेक देशांनी आपल्या नागरिकांना सतर्क केले आहे. त्यांनी आपल्या नागरिकांना शक्य असल्यास लेबनॉनसाठी प्रवास न करण्यास सांगितले आहे. 7 ऑक्टोबर रोजी हमासच्या हल्ल्यानंतर इस्रायलने गाझा पट्टीमध्ये विनाशकारी हल्ले सुरु केले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com