इराणच्या अध्यक्षयी निवडणुकीत इब्राहिम रइसी यांचा विजय

Ibrahim Raisi wins Irans presidential election
Ibrahim Raisi wins Irans presidential election
Published on: 
Updated on: 

तेहरान: इराणमधील (Iran) कट्टरतावादी नेते आणि न्यायप्रणालीचे प्रमुख इब्राहिम रइसी (Ibrahim Raisi) यांनी अध्यक्षपदाच्या निवडणुकीमध्ये मोठ्या फरकाने विजय संपादन केला आहे. त्यामुळे देशाचे सर्वोच्च नेते असणारे आयतुल्ला खेमेनी (Ayatollah Khemeni) यांची नागरी सत्तेवरील पकड अजून मजबूत झाली आहे. आत्तापर्यंतचे या अध्यक्षपदाच्या निवडणूकीत सर्वात कमी मतदान जाले आहे. प्राथमिक निकालानुसार, रइसी यांना एक कोटी 78 लाख मते मिळाली आहेत. आयतुल्ला खेमेनी यांचे नियंत्रण असलेल्या समितीने इब्राहिम रइसी यांच्या विरोधातील प्रमुख उमेदवारांना निवडणूकीसाठी अपात्र ठरवून त्यांच्या विजयाचा मार्ग मोकळा केल्याचे मानले जाते. त्यामुळे इराणी नागरिकांनी मतदानाकडे मोठ्या प्रमाणात पाठ फिरवली. माजी अध्यक्ष अहमेदिनेजाद (Ahmedinejad) यांनी अध्यक्षपदाच्या निवडणूकीवर बहिष्कार घालण्याचे आवाहन केले होते. ते कट्टरतावादी नेते म्हणून समजले जातात.

प्राथमिक निकालानुसार, रिव्होल्युशनरी गार्डचे माजी कमांडर मोहसीन रेझाई यांना 33 लाख, तर मध्यमवर्गीय नेते मानले जाणारे अब्दोलनासेर हेमती यांना 24 लाख मते मिळाली आहेत. इराणच्या अंतर्गत मंत्रालयातील निवडणूक मुख्यालयाचे प्रमुख जमाल ओर्क यांनी यासंबंधीची माहिती दिली आहे. अमीरहुसेन हाशेमी अध्यक्षपदाच्या शर्यतीत चौथे उमेदवार होते ज्यांना 10 लाख इराणी मतदारांनी पसंती दिली आहे, असे ओर्क यांनी सांगितले. शनिवारी हाशेमी यांनी इससी यांचे अभिनंदनही केले. रेझाई यांनी सोशल मिडियावरील ट्विटरवरील संदेशात खामेनी यांची प्रशंसा केली असून मतदारांचे आभार मानले आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.