Myanmar Military Airstrike: म्यानमारमध्ये लष्कराची क्रूरता… ताबडतोब हवाई हल्ले; कारवाईत 3000 जणांचा मृत्यू!

Myanmar Military Airstrike: म्यानमारमधील लोकशाहीवादी सरकार उलथवून लावत लष्कराने सत्ता हाती घेतली.
Myanmar Military Airstrike
Myanmar Military AirstrikeDainik Gomantak
Published on
Updated on

Myanmar Military Airstrike: म्यानमारमधील लोकशाहीवादी सरकार उलथवून लावत लष्कराने सत्ता हाती घेतली. यातच, मंगळवारी लष्कराने मध्य म्यानमारमध्ये नागरिकांच्या जमावावर केलेल्या हवाई हल्ल्यात 100 जण ठार झाले.

लष्करी राजवटीच्या विरोधकांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमासाठी हे लोक जमले होते.

लष्कराने फेब्रुवारी 2021 मध्ये आंग सान स्यू की यांच्या निवडलेल्या सरकारला (Government) उलथून टाकले आणि तेव्हापासून त्यांच्या राजवटीच्या विरोधात निदर्शने करण्यासाठी वारंवार हवाई हल्ले केले गेले.

सत्तापालट झाल्यापासून सुरक्षा दलाच्या कारवाईत म्यानमारमध्ये 3,000 हून अधिक नागरिकांचा मृत्यू झाल्याचा अंदाज आहे.

Myanmar Military Airstrike
Myanmar: म्यानमारमध्ये बंडखोर गटाच्या कार्यक्रमावर लष्कराचा हल्ला, 30 जण ठार

दरम्यान, म्यानमारच्या (Myanmar) लष्कराने नागरिकांवर केलेल्या हवाई हल्ल्यांचा संयुक्त राष्ट्रसंघाने तीव्र निषेध केला आहे.

संयुक्त राष्ट्राचे सरचिटणीस अँटोनियो गुटेरेस यांनी नागरिकांविरुद्ध लष्कराची मोहीम बंद करण्याचे आवाहन केले आहे, तसेच जबाबदार व्यक्तींना अटक करण्याची मागणी केली आहे.

संयुक्त राष्ट्रांचे मानवाधिकार उच्चायुक्त वोल्कर तुर्क यांनी एक निवेदन जारी करुन म्हटले की, हवाई हल्ल्याचे वृत्त अत्यंत अस्वस्थ करणारे आहे.

ते पुढे म्हणाले की, पीडितांमध्ये शाळकरी मुले आणि उद्घाटन समारंभाला उपस्थित असलेले इतर नागरिक यांचा समावेश आहे.

Myanmar Military Airstrike
Myanmar Earthquake: म्यानमारमध्ये जाणवले भूकंपाचे धक्के, रिश्टर स्केलवर 6.1 तीव्रता

दुसरीकडे, लष्कराने नागरिकांवर अत्याचार केल्याच्या आंतरराष्ट्रीय आरोपांचे खंडन केले आहे. ते म्हणाले की, आम्ही देशाला अस्थिर करु पाहणाऱ्यांच्या विरोधात लढत आहोत.

असोसिएटेड प्रेसने एका प्रत्यक्षदर्शीचा हवाला देऊन सांगितले की, लष्कराचा विरोध करणाऱ्या नॅशनल यूनिटी गव्हर्नमेंटच्या (NUG) स्थानिक कार्यालयाच्या उद्घाटनप्रसंगी सकाळी 8 वाजता जमलेल्या जमावावर लष्कराने हल्ला केला.

हेलिकॉप्टरमधून गोळीबार करण्यात आल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. उद्घाटन समारंभासाठी सुमारे 150 लोक जमले होते आणि मृतांमध्ये महिला आणि 20-30 मुलांचा समावेश आहे, असेही ते म्हणाले. मारल्या गेलेल्यांमध्ये सरकारविरोधी सशस्त्र गट आणि इतर विरोधी संघटनांचे नेते होते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com