

जेरुसलेम : कोरोना महामारीमुळे संपूर्ण जगभरात हाहाकार माजला आहे. मात्र त्याचवेळी इस्राईलने देश कोरोना मुक्त झाल्याच्या दावा केला आहे. देशात सर्व काही पूर्ववत झाले आहे. शाळा व महाविद्यालये उघडली गेली आहेत, तर सार्वजनिक ठिकाणी मास्कचे बंधनदेखील हटविण्यात आल्याचे इस्रायल सरकारने घोषणा केली आहे. देशातील यशस्वी लसीकरण मोहिमेमुळे रुग्णांची संख्या कमी झाली आहे. अशा परिस्थितीत नागरिकांवरील पुढील निर्बंधांवर चर्चा सुरू असल्याचे इस्रायली आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे. इस्राईलमध्ये रविवारपासून सार्वजनिक ठिकाणी मास्क घालण्याचा नियम काढून टाकण्याची घोषणा इस्रायलचे आरोग्यमंत्री युली एडल्स्टिन यांनी केली आहे. तसेच, कोरोनामुळे लावण्यात आलेले सर्व निर्बंध रद्द करण्याच्या निवेदनावर एडल्स्टिन यांनी स्वाक्षरी करण्यात आल्याचे वृत्त एक स्थानिक माध्यमाने दिले आहे. (This is how Israel became Corona free; Read detailed)
कसा कोरोनामुक्त झाला इस्रायल?
इस्राईल ऑडिट पार्टनर असलेल्या हगीट फिलो यांनी याबाबत माहिती दिली आहे. इस्राईलने एक अॅप तयार केला, त्या अॅपद्वारे लसीकरणासाठी अपॉइंटमेंट बुक केली जाते. त्यानंतर अॅप लसीकरणासाठी लसीकरण केंद्र आणि लसिकरणाचा वेळ देते. लसीकरण केंद्रावर गेल्यास थया ठिकाणी तुमचे आरोग्य कार्ड स्कॅन केले जाते आणि तुम्हाला लस मिळते. या पद्धतीमुळे याठिकाणी कोणतीही वेटिंग लाइन नव्हती. या द्वारे असे दिसून येते की इस्राईलमधील लोकांनी कोरोना साथीबद्दल जागरूकता दर्शविली आणि देशाची लसीकरण मोहिम यशस्वी केली. तसेच एकदा ही लस लस दिल्यानंतर, लसीचा आयडी डिजिटल पद्धतीने एका विशेष अॅपमध्ये लोड केला जातो. याचा वापर "ग्रीन पास" मिळविण्यासाठी होतो.
ग्रीन पासचा मोठा फायदा
इस्राईलमध्ये लसीकरण घेतलेल्या नागरिकांना ग्रीन पास देण्यात आले आहेत. मात्र हा ग्रीन पास कागदाचा नसून पूर्णपणे डिजिटल स्वरूपातील आहेत. सार्वजनिक ठिकाणी लसीकरणाचा पुरावा म्हणून या ग्रीन पासचा वापर करणे बंधनकारक आहे. लसीकरण केलेले नागरिक सार्वजनिक ठिकाणी कोणत्याही वेळी फोनद्वारे हा ग्रीन पास दाखवू शकतात. म्हणून कागदाचे प्रमाणपत्र किंवा कार्ड घेऊन जाण्याची आवश्यकता नाही.
डिजिटल माध्यमाचा आधार
इस्त्राईलमध्ये लोक लसीसाठी डिजिटल माध्यमांचा अवलंब करीत आहेत. अॅपद्वारे अपॉइंटमेंट बुक करून कोणत्याही गर्दीशिवाय त्यांचे लसीकरण होत आहे. त्यासोबतच नागरिकांना काही शंका असतील तर त्या शंकांचेही निरसन केले जाते. आरोग्य सेवा देखभाल करणार्या संस्था आणि आरोग्य सेवा पुरविणार्या प्रत्येक नागरिकासाठी संपूर्ण डिजिटल रेकॉर्ड आहे. ही सेवा प्रणाली लोकांसाठी खूप सोपी केली गेली आहे.
विशेष म्हणजे, इस्त्राईलमध्ये कोरोना महामारीच्या सुरूवातील म्हणजे एप्रिल 2020 मध्ये सार्वजनिक ठिकाणी मास्क वापरणे बंधनकारक करण्यात आले होते. तसेच मास्क न घातल्यास 200 शेकेल (इस्त्राईल चलन) इतका दंड आकारला जात होता. ज्यात जुलै 2020 मध्ये वाढ करून 500 शेकेल इतका दंड आकारण्यास येत होता.
तथापि, इस्राईलमध्ये 93 लाख लोकसंख्येपैकी 53 टक्के लोकांनी लसीचे दोन्ही डोस घेतले आहेत. यामुळे तेथे कोरोना संसर्गाचे प्रमाण झपाट्याने कमी झाले. त्यानंतरच, संपूर्ण वर्षभरानंतर आता कोरोना नियम शिथिल करण्याचा निर्णय घेण्यात आला. या अंतर्गत उद्याने, रस्ते यासारख्या मोकळ्या सार्वजनिक ठिकाणी मास्क लावणे बंधनकारक राहिले नाही. मात्र गर्दीच्या ठिकाणी मास्क लावणे आवश्यक असल्याचे सांगण्यात आले आहे.
कोरोना महामारीच्या सुरूवातीलाच इस्रायईलमध्येही कोरोना रुग्णसंख्येत वाढ होऊ लागली होती. एक वर्षात तब्बल 8,36, 000 लोक कोरोनाने बाधित झाले होते. तर 6,331 मृत्यूची नोंद करण्यात आली होती. दरम्यान, लस तयार होताच इस्त्रायलने फायझरसोबत करार केला आणि लसीकरण मोहीम सुरू केली. आता इस्राईलमध्ये एकूण 93 लाख लोकसंख्येपैकी 53 टक्क्यांपेक्षा जास्त लोकांनी ही लस घेतली आहे.
डिसेंबरमध्ये जगातील अनेक देश या या करारावर स्वाक्षरी करत होते, तर दुसरीकडे इस्राईलमध्ये लसीकरण मोहीम सुरूही झाली होती. यामुळे, इस्त्राईलमध्ये संसर्गाचे प्रमाण वेगाने कमी होऊ लागले आणि हळूहळू येथे व्यापारी संस्था सुरू होऊ लागल्या. जानेवारीत रोज दहा हजार कोरोना प्रकरणे समोर येत होती, ती मार्चमध्येच जवळपास 200 झाली. यामुळे सरकारवरील आत्मविश्वास वाढला. आता अलीकडेच कोरोना प्रोटोकॉलमधील बरेच नियम शिथिल करण्यात आले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.