Nancy Pelosi: यूएस हाऊस स्पीकर नॅन्सी पेलोसी यांच्या पतीवर अज्ञाताकडून हल्ला

US House Speaker Nancy Pelosi: यूएस हाऊस स्पीकर नॅन्सी पेलोसी यांचे पती पॉल पेलोसी यांच्यावर शुक्रवारी पहाटे हल्ला झाला.
Nancy Pelosi
Nancy PelosiDainik Gomantak
Published on
Updated on

Nancy Pelosi: यूएस हाऊस स्पीकर नॅन्सी पेलोसी यांचे पती पॉल पेलोसी यांच्यावर शुक्रवारी पहाटे हल्ला झाला. पेलोसी यांच्या कार्यालयाने एका निवेदनाद्वारे ही माहिती दिली. निवेदनात म्हटले की, “हिंसक हल्ल्यानंतर” सॅन फ्रान्सिस्को (San Francisco) येथील त्यांच्या घराची तोडफोडही करण्यात आली आहे. त्याचबरोबर हल्लेखोराला ताब्यातही घेण्यात आले आहे. हल्ल्याचे कारण तपासले जात आहे. दुसरीकडे, नॅन्सी पेलोसी यांच्या पतीला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे, जिथे त्यांच्यावर उपचार सुरु आहेत."

निवेदनानुसार, दुखापत फारशी गंभीर नाही. ते लवकरच बरे होतील. हल्ल्यावेळी अमेरिकेन सभागृहाच्या अध्यक्षा नॅन्सी पेलोसी (Nancy Pelosi) त्यांच्या सॅन फ्रान्सिस्को येथील घरी नव्हत्या. दुसरीकडे, पेलोसी यांच्या प्रवक्त्याने सांगितले की, हल्ल्याच्या वेळी नॅन्सी वॉशिंग्टनमध्ये (Washington) होत्या. हल्ल्याची स्थिती अद्याप स्पष्ट झालेली नाही. हल्लेखोर घरात कसे आणि कोणत्या वेळी घुसले याचा शोध घेण्याचा पोलिस प्रयत्न करत आहेत.

Nancy Pelosi
Nancy Pelosi Taiwan Visit: नॅन्सी पेलोसी तैवानमध्ये दाखल, चीनने अमेरिकेला दिली युध्दाची धमकी

दुसरीकडे, मध्यावधी निवडणुकीच्या (Election) दोन आठवड्यांपूर्वी हा हल्ला झाला. 82 वर्षीय पॉल पेलोसी सॅन फ्रान्सिस्को-आधारित रिअल इस्टेट आणि व्हेंचर कॅपिटल फर्मचे मालक आहेत. मे महिन्यात एका ऑटो अपघातानंतर दारुच्या नशेत गाडी चालवल्याबद्दल त्यांना दोषी ठरवण्यात आले होते. विशेष म्हणजे, त्यांना कॅलिफोर्नियातील (California) नापा काउंटीमध्ये पाच दिवसांच्या तुरुंगवासाची शिक्षाही झाली होती.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com