Pakistan Road Accident: पाकिस्तानमधून एक मोठी बातमी समोर येत आहे. ही घटना पाकिस्तानच्या पंजाब प्रांतात घडली आहे. पाकिस्तानच्या पंजाब प्रांतात लग्नाचं वर्हाड घेऊन परतणारी बस खोल दरीत कोसळल्याने 15 जण ठार आणि 60 जण जखमी झाल्याची माहिती अधिकाऱ्यांनी सोमवारी दिली.
मिळालेल्या माहितीनुसार, इस्लामाबादहून लाहोरला जाणारी बस रविवारी रात्री उशिरा लाहोरपासून 240 किमी अंतरावर असलेल्या कल्लर कहर सॉल्ट रेंज परिसरात उलटली. बचाव सेवेचे अधिकारी मुहम्मद फारुक यांनी सोमवारी सांगितले की, "बस उलटण्यापूर्वी विरुद्ध दिशेने येणाऱ्या तीन वाहनांना धडकली आणि नंतर दरीत कोसळली." बस एका लग्न (Marriage) समारंभातून परतणाऱ्या लोकांना घेऊन जात होती.
आपत्कालीन बचाव सेवा 'रेस्क्यू 1122' ने सांगितले की, ब्रेक फेल झाल्यामुळे हा अपघात झाला. फारुख म्हणाले की, मृत आणि अनेक जखमींना बसमधून बाहेर काढण्यात आले. ते पुढे म्हणाले की, "जखमींना रावळपिंडी आणि इस्लामाबाद येथील रुग्णालयात (Hospital) नेण्यात आले असून, त्यापैकी 11 जणांची प्रकृती चिंताजनक आहे."
दुसरीकडे, मृतांमध्ये सहा महिलांचा समावेश असल्याचे त्यांनी सांगितले. पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी या अपघातावर शोक व्यक्त केला आहे. जखमींना चांगल्या वैद्यकीय सुविधा देण्याचे निर्देशही त्यांनी अधिकाऱ्यांना दिले.
यापूर्वी, फेब्रुवारी महिन्याच्या सुरुवातीला पाकिस्तानातील पेशावरमध्ये मोठा रस्ते अपघात झाला होता. या अपघातात सुमारे 17 जणांचा मृत्यू झाला होता. बस आणि ट्रकची समोरासमोर धडक होऊन 17 जणांचा मृत्यू झाला होता. पेशावरच्या नैऋत्येला सुमारे 40 किमी अंतरावर सिंधू महामार्गावरील कोहाटजवळ हा अपघात झाला.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.