Pakistan: मोठा खुलासा! पाकिस्तानात हिंदू मुलींवर बलात्कार, या कामात सरकारचाही हात

Atrocities On Pakistan Minorites: सध्या पाकिस्तान अनेक गंभीर समस्यांनी घेरला आहे. अल्पसंख्याकांच्या अत्याचाराशी संबंधित अहवालाने पाकिस्तानचा पर्दाफाश झाला आहे.
Pakistan Citizens
Pakistan Citizens Dainik Gomantak
Published on
Updated on

Atrocities On Pakistan Minorites: सध्या पाकिस्तान अनेक गंभीर समस्यांनी घेरला आहे. यातच अल्पसंख्याकांवरील अत्याचाराशी संबंधित अहवालाने पाकिस्तानचा पर्दाफाश केला आहे.

वृत्तसंस्था एएनआयने एका वृत्ताचा हवाला देत म्हटले आहे की, पाकिस्तानमध्ये अल्पवयीन मुलींचे अपहरण, बलात्कार आणि धर्मांतराच्या घटना वाढत आहेत. विशेष म्हणजे, सरकार देखील पीडितांच्या बाजूने हस्तक्षेप करण्यास नकार देत आहे.

जस्ट अर्थ न्यूजमध्ये प्रकाशित झालेल्या एका अहवालात पाकिस्तानमधील हिंदू अल्पसंख्याक गटांविरुद्धच्या अलीकडच्या वाढत्या गुन्ह्यांचे विश्लेषण केले आहे. अशा प्रकरणांकडे पाकिस्तानी अधिकारी दुर्लक्ष करत आहे.

अहवालानुसार, पाकिस्तानने (Pakistan) अलीकडेच एका विधेयकावर आक्षेप घेतला होता, जे देशातील अल्पसंख्याकांच्या हक्कांचे संरक्षण करण्यासाठी आणले जाणार होते. देशाच्या धार्मिक व्यवहार आणि आंतरधर्मीय सौहार्द मंत्रालयाने मानवाधिकार मंत्रालयाने तयार केलेल्या विधेयकावर आक्षेप घेतला.

Pakistan Citizens
Pakistan Economic Crisis: कंगाल PAK ला आता अफगाण तालिबानने दिला मोठा झटका, बॉर्डर केली बंद

तसेच, हिंदू अल्पसंख्याकांचे सक्तीच्या धर्मांतरापासून संरक्षण करण्यासाठी धर्मांतर प्रतिबंध कायदा 2021 चा मसुदा कायद्याची सुनावणी न करता फेटाळण्यात आल्याचा दावा या अहवालात करण्यात आला आहे.

विशेष म्हणजे, देशात वाढत्या असंतोषामुळे, बेपत्ता बलूच लोकांच्या कुटुंबीयांनी कराचीमध्ये बलुच मुले, महिला आणि तरुणांच्या बेपत्ता होण्याच्या वाढत्या घटनांविरोधात निदर्शने केली आहेत. समुदायाने न्यायाच्या हितासाठी संयुक्त राष्ट्र आणि इतर आंतरराष्ट्रीय समुदायांना हस्तक्षेप करण्याची मागणी केली.

त्याचवेळी, अहवालात पुढे असेही म्हटले आहे की, पाकिस्तानमध्ये अल्पवयीन मुलींचे अपहरण, बलात्कार आणि धर्मांतर करण्याची प्रथा सामान्य झाली आहे.

कलम 20 अंतर्गत पाकिस्तानी राज्यघटनेने प्रत्येक नागरिकाला (Citizen) धर्म स्वीकारण्याचा, आचरण करण्याचा आणि प्रचार करण्याचा अधिकार दिला असला, तरी ख्रिश्चन आणि हिंदू तरुण मुली आणि महिला त्याच्या कक्षेबाहेर आहेत.

Pakistan Citizens
Pakistan Inflation: दिवाळखोर PAK ने मोडले महागाईचे सर्व रेकॉर्ड, आकडे जाणून तुम्हालाही वाटेल आश्चर्य

त्यात पुढे म्हटले आहे की, मीडिया, नागरी समाज आणि मानवाधिकार गट या गुन्ह्याकडे दुर्लक्ष करतात, कारण या मुली अल्पसंख्याक समुदायातील आहेत. 2022 मध्ये फैसलाबादमध्ये एका 15 वर्षीय ख्रिश्चन मुलीला एका मुस्लिम व्यक्तीने नेले तेव्हा मानवी हक्कांचे उल्लंघन झाल्याची घटनाही अहवालात नमूद करण्यात आली आहे.

शिवाय, दरवर्षी अशी सुमारे 1000 प्रकरणे समोर येतात, ज्यात हिंदू मुलीचे अपहरण, बलात्कार आणि जबरदस्तीने लग्न केले जाते. 2021 मध्ये संख्या वाढली जिथे 80 टक्के आणि 2020 मध्ये 50 टक्क्यांहून अधिक वाढ झाली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com