Angelina Jolie पूरग्रस्त पाकिस्तानच्या भेटीला; जगाला केले मदतीचे आवाहन

पूरामुळे 1,600 नागरिकांचा मृत्यू झाला असून, जवळपास पन्नास लाख लोक स्थलांतरित झाले आहेत.
Angelina Jolie
Angelina JolieDainik Gomantak
Published on
Updated on

पाकिस्तानमध्ये सध्या पूराने (Pakistan Flood) थैमान घातले आहे. या पूरात हजारो नागरिकांचा मृत्यू झाला असून, लाखो लोकांचे स्थलांतर करण्यात आले आहे. आधीच आर्थिक संकटात असलेल्या पाकिस्तानची पूरामुळे अजून कंबर मोडली आहे. पाकिस्तानातील जनजीवन पूर्वपदावर येण्यासाठी जगभरातून मदत आणि प्रार्थना केली जात आहे. यातच हॉलिवूड स्टार अँजोलिना जोली (Hollywood Star Angelina Jolie) देखील पाकिस्तानच्या भेटीवर आली आहे. अँजोलिनाने जगाला पाकिस्तानच्या मदतीसाठी पुढे येण्याचे आवाहन केले आहे.

Angelina Jolie
Angelina JolieDainik Gomantak
Angelina Jolie
Imran Khan: इम्रान खान बनले PM मोदींचे जबरा फॅन! या मुद्यावरुन पुन्हा केले कौतुक

पाकिस्तानमधील अभूतपूर्व पूरामुळे 1,600 नागरिकांचा मृत्यू झाला असून, जवळपास पन्नास लाख लोक स्थलांतरित झाले आहेत. पाकिस्तानचा एक तृतियांश भाग पूराखाली असून, जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. हॉलिवूड स्टार अँजोलिना जोली (Angelina Jolie) बुधवारी पाकिस्तानमध्ये दाखल झाली. अँजोलिना जोलीने पूरग्रस्त भागाला भेट देत, पूर पिडित नागरिकांची विचापूस करून त्यांचे सांत्वन केले. वातावरण बदलाचे परिणाम पाकिस्तान पूराच्या रूपाने समोर आले आहेत. संपूर्ण जागासाठी हा एक इशारा आहे.

Angelina Jolie
Angelina JolieDainik Gomantak
Angelina Jolie
RG Party:'पाकिस्तान झिंदाबाद' चा नारा देणाऱ्यांवर गुन्हा दाखल करा

हॉलिवूड स्टार अँजोलिना जोलीने जगाला पाकिस्तानला मदत करण्याचे आवाहन केले. अँजोलिना यापूर्वी 2010 मध्ये आलेला पूर आणि 2005 मध्ये झालेल्या भूकंपात पाकिस्तानला भेट दिली होती. त्यानंतर पहिल्यांदा अँजोलिना पाकिस्तानच्या भेटीवर आली आहे. अभिनेत्री जोलीने भेटी दरम्यान पाकिस्तानच्या अधिकाऱ्यांची बैठक घेत पूरस्थितीची माहिती घेतली व बैठकीला संबोधित केले.

Angelina Jolie
Angelina JolieDainik Gomantak

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com