'या' कारणावरुन पाकिस्तानात हिंदू कॉलेजमधील शिक्षकाला सुनावली जन्मठेपेची शिक्षा

पाकिस्तानात हिंदू शिक्षकाला जन्मठेपेची शिक्षा.
Jail
JailDainik Gomantak
Published on
Updated on

पाकिस्तानच्या सिंध प्रांतात एका हिंदू महाविद्यालयीन शिक्षकाला ईशनिंदा केल्याप्रकरणी जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. स्थानिक माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, सेशन्स कोर्टाने शिक्षिकेला ईशनिंदा केल्याप्रकरणी दोषी धरून दंडही ठोठावला आहे. न्यायालयाने त्यांना 50 हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. नौतन लाल असे दोषीचे नाव असून तो एका शासकीय पदवी महाविद्यालयात शिक्षक आहे. माहितीनुसार, त्याला 2019 मध्ये अटक करण्यात आली होती आणि तेव्हापासून तो अंडरट्रायल कैदी म्हणून तुरुंगात आहे. (Pakistan Hindu Teacher Latest News)

पाकिस्तानात हिंदू शिक्षकाला जन्मठेपेची शिक्षा

मीडिया रिपोर्ट्सनुसार, 2019 मध्ये त्याला अटक झाल्यानंतर या काळात दोनदा त्याचा जामीन अर्ज फेटाळण्यात आला होता. 14 सप्टेंबर 2019 रोजी सोशल मीडियावर (Social Media) एक व्हिडिओ शेअर करण्यात आला ज्यामध्ये एका विद्यार्थ्याने दावा केला की स्थानिक शाळेच्या मालकाने ईशनिंदा केली आहे. सेंटर फॉर रिसर्च अँड सिक्युरिटी स्टडीज या थिंक टँकच्या म्हणण्यानुसार, 1947 पासून पाकिस्तानमध्ये ईशनिंदेचे एकूण 1,415 गुन्हे नोंदवले गेले आहेत.

Jail
अमेरिकेच्या उपराष्ट्रपती कमला हॅरिस यांचे पती बॉम्ब धमाक्यातून बचावले

ईशनिंदेच्या आरोपावरून पाकिस्तानमध्ये अनेकांची हत्या करण्यात आली

थिंक टँकच्या अहवालानुसार, 1947 ते 2021 पर्यंत एकूण 18 महिला आणि 71 पुरुषांची ईशनिंदा केल्याप्रकरणी हत्या करण्यात आली. थिंक टँकच्या मते, प्रकरणांची वास्तविक संख्या जास्त असू शकते कारण सर्व ईशनिंदेची प्रकरणे मीडियामध्ये नोंदवली जात नाहीत. अहवालात असेही म्हटले आहे की 70 टक्क्यांहून अधिक आरोपी पाकिस्तानच्या पंजाब प्रांतातून नोंदवले गेले आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com