Hibatullah Akhundzada
Hibatullah AkhundzadaDainik GOmantak

तालिबानचा प्रमुख कोण? एक फोटो सोडल्यास दुसरी माहिती नाही

Afghanistan Crisis: तालिबानचे अनेक नेते आणि प्रवक्ते माध्यमांसमोर आले मात्र तालिबान प्रमूख हिबतुल्ला अखुंदजादा (Hibatullah Akhundzada) हा चेहरा माध्यमांच्या किंवा लोकांच्या समोर आला नाही.
Published on

अफगाणिस्तानमध्ये (Afghanistan) तालिबानचे (Taliban) वर्चस्व निर्माण झाल्यापासून तालिबानचे अनेक नेते, शस्त्रधारी विद्यार्थी आणि तालिबान समर्थक राजधानी काबूलमध्ये दाखल झाले आहेत. मात्र असे असताना देखील एक बाब लक्षणीय ठरते आहे. जगभरात तालिबानची चर्चा सुरु असताना तालिबानचा प्रमूख अजूनही पडद्यामागेच आहे. तालिबानचे अनेक नेते आणि प्रवक्ते माध्यमांसमोर आले मात्र तालिबान प्रमूख हिबतुल्ला अखुंदजादा (Hibatullah Akhundzada) हा चेहरा माध्यमांच्या किंवा लोकांच्या समोर आला नाही.

2016 पासून तालिबानचा प्रमूख असलेला हिबतुल्ला अखुंदजादाने कारभार हाती घेतल्यानंतर त्याच्यावर जिहादी चळवळीला एकत्र करण्याची मोठी जबाबदारी देण्यात आली होती. सत्ता संघर्षादरम्यान विखुरल्या गेलेली ही चळवळीला पुन्हा एक करण्याचे काम हिबतुल्ला अखुंदजादाकडे देण्यात आले होते. हिबतुल्ला अखुंदजादाच्या रोजच्या हालचालींबद्दल अजूनही फारशी माहिती समोर येत नाही. त्याच्या सार्वजनिक प्रोफाइलचा उपयोग फक्त इस्लामिक सुट्ट्यांमध्ये वार्षिक संदेश जाहीर करण्यापुरताच होताना दिसुन आला आहे.

तालिबानने प्रसिद्ध केलेल्या एका फोटो व्यतिरिक्त, हा तालिबानी नेता कधीही सार्वजनिक ठिकाणी दिसला नाही. हिबतुल्ला अखुंदजादाबद्दल अनेक गोष्टी अजूनही गुलदस्त्यातच आहेत. ऑगस्टमध्ये काबूलवर आपला झेंडा लावल्यापासून हिबतुल्ला अखुंदजादाच्या हालचालींबद्दल मौन बाळगले जात असल्याचे दिसते आहे.

Hibatullah Akhundzada
प्रत्येकाने 'रायफल' सोबत ठेवावी, बंदुका खरेदी करणाऱ्यांना त्रास देऊ नका: ब्राझील राष्ट्राध्यक्ष

हिबतुल्ला अखुंदजादाच्या हालचालींबद्दल विचारले असता तालिबानचे प्रवक्ते जबीहुल्ला मुजाहिद यांनी या आठवड्यात पत्रकारांना सांगितले, "देवाच्या इच्छेनुसार तुम्ही त्यांना लवकरच भेटाल."

तालिबानच्या विविध गटांच्या प्रमुखांनी काबूलमधील मशिदींमध्ये उघडपणे प्रचार केला आहे, विरोधी पक्षांच्या सुद्धा भेटीगाठी घेतल्या आहेत आणि अगदी अलीकडेच अफगाणिस्तानच्या क्रिकेट अधिकाऱ्यांशी देखील चर्चा केली आहे. मात्र असे असताना देखील तालिबान प्रमूख लोकांसमोर येताना दिसत नाही.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com