Israel-Hamas War: उत्तर इस्रायलमध्ये हिजबुल्लाहचे हल्ले सुरुच, IDF ने सीरियन हवाई संरक्षण यंत्रणेला केले लक्ष्य

Israel-Hamas War: युद्धविरामात हिजबुल्लाचा सहभाग नसला तरी गेल्या आठवड्यात त्याने आपले हल्ले थांबवले होते, त्यामुळे इस्रायललाही आपली लष्करी कारवाई थांबवावी लागली होती.
IDF Targeting Syrian Air Defense System
IDF Targeting Syrian Air Defense System Dainik Gomantak
Published on
Updated on

Israel-Hamas War: इस्रायल आणि हमास यांच्यातील सात दिवसांच्या युद्धविरामाच्या समाप्तीनंतर इस्रायली सुरक्षा दलांनी शनिवारी दक्षिण लेबनॉनमधील हिजबुल्लाच्या ठिकाणांवर हल्ला केला. युद्धविरामात हिजबुल्लाचा सहभाग नसला तरी गेल्या आठवड्यात त्याने आपले हल्ले थांबवले होते, त्यामुळे इस्रायललाही आपली लष्करी कारवाई थांबवावी लागली होती. मात्र गाझामधील युद्धविराम संपल्यानंतर इस्रायलच्या उत्तरेकडील भागात पुन्हा एकदा हल्ले तीव्र झाले आहेत.

उत्तर इस्रायलमध्ये हिजबुल्लाहचे हल्ले सुरुच

दरम्यान, शनिवारी लेबनॉनमधून शोमेरामध्ये दोन मोर्टार डागण्यात आले. हे दोन्ही मोर्टार मोकळ्या जागेत पडले, यादरम्यान कोणतीही जीवितहानी झाल्याची माहिती मिळालेली नाही. दुपारी अनेक रॉकेटही डागण्यात आले. या हल्ल्यांची जबाबदारी हिजबुल्लाने घेतली आहे. प्रत्युत्तर म्हणून इस्रायलने लेबनॉनमधील दहशतवाद्यांच्या ठिकाणांवर हवाई हल्ले केले.

IDF Targeting Syrian Air Defense System
Israel-Hamas War: इस्रायल-हमास युद्ध पुन्हा सुरु, गाझामध्ये मृतांचा आकडा 15 हजारांच्या पार!

दुसरीकडे, दक्षिण लेबनॉनमध्ये झालेल्या हल्ल्यानंतर त्याचे 79 सदस्य मारले गेल्याचे हिजबुल्लाहने म्हटले आहे. इस्रायलमध्ये सहा सैनिकांसह तीन स्थानिक लोकांचा मृत्यू झाला आहे. ब्रिटनस्थित सीरियन ऑब्झर्व्हेटरी फॉर ह्युमन राइट्सचे प्रमुख रामी अब्देल रहमान यांनी सांगितले की, हिजबुल्लासाठी काम करणारे दोन सीरियन सैनिक मारले गेले. संस्थेचे काम करणारे इतर सात जण जखमी झाले आहेत. मात्र, इस्त्रायली सैनिकांनी सीरियातील हल्ल्याबाबत कोणतेही वक्तव्य दिलेले नाही. संघटनेसाठी असलेल्या शस्त्रांच्या शिपमेंटवर हल्ला करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. इस्रायलचे हवाई हल्ले सातत्याने सीरियाच्या हवाई संरक्षण यंत्रणेला लक्ष्य करत आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com