चीनमध्ये अजूनही कोरोनाची (Corona) भीती इतकी पसरली आहे की, माणसांसोबतच प्राण्यांचीही कोविड चाचणी करण्यात येत आहे. आता चीनच्या शियामेन शहरातील एक व्हिडिओ व्हायरल होत आहे ज्यामध्ये आरोग्य कर्मचारी समुद्रातून पकडलेल्या माशांचे नमुने घेतांना आणि त्यांची चाचणी घेण्यासाठी व्यापाराद्वारे आणताना दिसून येत आहेत. (havoc of China As the cases increased in Xiamen it was decided to test fish for corona)
वास्तविक, झियामेन शहरात कोरोनाचे सुमारे 40 प्रकरणे समोर आल्यानंतर 50 लाखांहून अधिक लोकांना कोविड-19 चाचणी घेण्याचे आदेश देण्यात आले आहेत. आता माणसांसोबतच प्राण्यांचीही कोविड चाचणी करण्यात आली आहे तसेच नवीन कोविड चाचणी मोहिमेत काही समुद्री जीव देखील सहभागी होण्याची अपेक्षा असल्याचे एका अधिकृत नोटीसमध्ये म्हटले आहे.
मच्छिमारांसोबतच सागरी प्राण्यांचीही चाचणी घेतली जात आहे
अलिकडच्या आठवड्यात, झियामेनच्या जिमी मरीन एपिडेमिक कंट्रोल डिस्ट्रिक्ट कमिटीने एक नोटीस जारी केली की मच्छीमार त्यांच्या बंदरांवर परत येतात तेव्हा मच्छिमार आणि त्यांचे सीफूड दोघांचीही COVID-19 साठी चाचणी करायला हवी. यानंतर, सोशल मीडियावर अनेक व्हिडिओ समोर आले, ज्यामध्ये वैद्यकीय कर्मचारी जिवंत मासे आणि खेकड्यांची कोविड-19 पीसीआर चाचणी करताना दिसून येत होते.
चीनने यापूर्वीच प्राण्यांची कोविड चाचणी केली आहे
चिनी प्रसारमाध्यमांनी दीर्घकाळ चिंता व्यक्त केली आहे की समुद्रातील प्राणी कोरोना व्हायरसशी संबंधित असू शकतात तसेच कोविड-19 ची सुरुवात मध्य चीनच्या वुहान शहरातून झाली होती. त्यानंतर हा विषाणू वुहानच्या सीफूड मार्केटमधून निर्माण झाल्याचे सांगण्यात आले होते. मात्र, प्राण्यांपासून कोरोनाचा प्रसार झाल्याचे अध्याप सिद्ध झालेले नाही.
मात्र, गेल्या दोन वर्षांत चीनच्या या मोहिमेदरम्यान केवळ मासेच नाही तर इतर प्राण्यांचीही कोविड-19 चाचणी करण्यात आली. मे मध्ये, चिनी मीडियाने पूर्व झेजियांगच्या हुझोउ येथील वन्यजीव उद्यानात हिप्पोची चाचणी घेतल्याचे फुटेज प्रसारित केले होते.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.