Viral Video: ‘’त्या गर्भवती असू शकतात’’, इस्रायली महिला सैनिकांच्या अपहरणाचा धक्कादायक व्हिडिओ व्हायरल!

Israel Hamas War: सोशल मीडियावर सध्या एक व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ पाहून तुम्हालाही धक्का बसेल.
Viral Video
Viral VideoDainik Gomantak

Israel Hamas War: सोशल मीडियावर सध्या एक व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ पाहून तुम्हालाही धक्का बसेल. इस्रायलने सात महिला इस्रायली सैनिकांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. आधी तुम्ही हा व्हिडिओ पाहा.... हमासच्या दहशतवाद्यांनी या इस्त्रायली महिलांचे सैनिकांचे अपहरण केले. गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये हल्ल्यादरम्यान या महिला सैनिकांचे हमासने अपहरण केले होते. आता या अपहरणाचा आणखी एक व्हिडिओ समोर आला आहे. हा व्हिडिओ होस्टेज फॅमिली फोरमने जारी केला आहे. गेल्या वर्षी 7 ऑक्टोबर रोजी, हमासने दक्षिण इस्रायलवर हल्ला केला ज्यामध्ये सुमारे 1,200 लोक मारले गेले तर सुमारे 250 लोकांना हमासने ओलीस ठेवले, ज्याला प्रत्युत्तर म्हणून इस्रायलने गाझामध्ये लष्करी हल्ला केला ज्यामध्ये सुमारे 35,000 पॅलेस्टिनी मारले गेले.

दरम्यान, इस्रायल-हमास युद्धासंबंधित अनेक व्हिडिओ समोर आले आहेत. ताजा व्हिडिओ इस्रायली महिला सैनिकांचा आहे. नाहल ओज बेसवरुन त्यांचे अपहरण झाल्याचा आरोप आहे. टाईम्स ऑफ इस्रायलने दिलेल्या वृत्तानुसार, हल्लेखोरांनी बॉडी कॅमेरे घातले होते. त्या कॅमेऱ्यांमध्ये टिपलेल्या भयानक फुटेजमध्ये लिरी अल्बाग, करीना एरिव्ह, अगम बर्गर, डॅनिएला गिलबोआ आणि नामा लेव्ही नावाच्या महिला सैनिकांचे अपहरण झाल्याचे उघड झाले.

Viral Video
Israel Hamas War: ‘’गाझावर अणुहल्ला होऊ द्या, इस्रायल युद्ध हरु शकत नाही’’, अमेरिकन खासदाराच्या वक्तव्याने गोंधळ

व्हिडिओमध्ये पाच महिला दिसत आहेत. त्यांचे हात बांधण्यात आले असून काहींच्या चेहऱ्यावर रक्त आहे. एक दहशतवादी महिला सैनिकांकडे बोट दाखवून म्हणतो की, "त्या गर्भवती असू शकतात. या झिओनिस्ट आहेत." हमासचे दहशतवादी इस्रायली लोकांना ‘झिओनिस्ट’ म्हणतात. हमासचा एक दहशतवादी एका इस्रायली महिला सैनिकाला म्हणतो की, "तू खूप सुंदर आहेस." व्हिडिओमध्ये महिला सैनिकांना जमिनीवर बसवले जात असल्याचे दिसत आहे. ओलिसांपैकी एक महिला सैनिक दहशतवाद्यांना सांगते की, "माझे पॅलेस्टाईनमध्ये मित्र आहेत."

Viral Video
Israel Hamas War: रफाह शहराच्या सीमेजवळ इस्त्रायलची मोठी तयारी; ‘हा’ मुस्लिम मित्र देश संतापला; नेतन्याहू यांना दिला इशारा

तेव्हाच आणखी दहशतवादी म्हणतो की, 'तुमच्यामुळे आमचे लोक मारले गेले, आम्ही तुम्हा सर्वांना गोळ्या घालू.' व्हिडिओत पुढे दिसत आहे की, महिला सैनिकांना एकामागून एक जीपमध्ये बसवले जात आहे. इस्रायली सरकारला ताबडतोब वाटाघाटी पुन्हा सुरु करण्यास उद्युक्त करण्याच्या आशेने होस्टेज फॅमिली फोरमने व्हिडिओ जारी केला आहे. टाईम्स ऑफ इस्रायलच्या वृत्तानुसार, पाच महिला सैनिकांच्या नातेवाईकांचे म्हणणे आहे की, सार्वजनिकपणे प्रसारित केलेली तीन मिनिटांची क्लिप हे मूळ 13 मिनिटांचे फुटेज आहे, जे सेन्सॉर करुन रिलीज केले गेले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com