Hafiz Saeed: आता 26/11 चा मिळणार न्याय! भारताने पाकिस्तानशी साधला संपर्क; हाफिज सईदच्या प्रत्यार्पणाची केली मागणी

Hafiz Saeed Extradition News: भारताचा शत्रू आणि 26/11 हल्ल्याचा मास्टरमाईंड हाफिज सईदला भारतात आणण्याच्या प्रयत्नाला आता गती मिळाली आहे.
Hafiz Saeed Extradition News
Hafiz Saeed Extradition NewsDainik Gomantak
Published on
Updated on

Hafiz Saeed Extradition News: भारताचा शत्रू आणि 26/11 हल्ल्याचा मास्टरमाईंड हाफिज सईदला भारतात आणण्याच्या प्रयत्नाला आता गती मिळाली आहे. भारत सरकारने सईदचे पाकिस्तानकडे प्रत्यार्पण करण्याची औपचारिक मागणी केल्याचे वृत्त आहे. मात्र, याबाबत दोन्ही देशांकडून अधिकृतपणे काहीही सांगण्यात आलेले नाही. विशेष म्हणजे, लष्कर-ए-तैयबाच्या दहशतवाद्याचा भारतातील मोस्ट वॉन्टेडच्या यादीत समावेश आहे.

दरम्यान, एलईटीची निर्मिती करणाऱ्या सईदला भारतात आणण्याची प्रक्रिया लवकरच सुरु होऊ शकते. इंडिया टुडेने सूत्रांच्या हवाल्याने म्हटले आहे की, परराष्ट्र मंत्रालयाने पाकिस्तानला औपचारिक विनंती केली आहे. याद्वारे सईदच्या प्रत्यार्पणासाठी कायदेशीर प्रक्रिया सुरु करण्याची मागणी करण्यात आली आहे. अमेरिकेने या दहशतवाद्यावर 10 मिलियन डॉलर्सचे बक्षीस जाहीर केले आहे. मात्र, ही पहिलीच वेळ नाही आणि याआधीही भारताकडून सईदच्या प्रत्यार्पणाची मागणी सातत्याने होत आहे.

Hafiz Saeed Extradition News
Pakistan Election: हाफिज सईदची पार्टी लढवणार निवडणूक; दहशतवादी मुलगाही आजमावणार नशीब

दुसरीकडे, भारत आणि पाकिस्तान यांच्यात प्रत्यार्पण करार नसल्यामुळे या प्रक्रियेवर परिणाम होत असल्याचे सांगण्यात येत आहे. विशेष म्हणजे, गेल्या वर्षी एप्रिलमध्येही सईदला 31 वर्षांची शिक्षा झाल्याची बातमी आली होती. त्यादरम्यान त्याच्यावर दहशतवाद्यांना आर्थिक मदत केल्याचा आरोप होता. मात्र, तो तुरुंगात आहे की नाही हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. गेल्या वर्षीच भारताने सईदचा मुलगा तलहा सईद यालाही UAPA अंतर्गत दहशतवादी घोषित केले होते. सध्या ते पाकिस्तानमध्ये होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुका लढवण्याच्या तयारीत आहेत. तल्हा पाकिस्तान मरकझी मुस्लिम लीग (PMML) कडून निवडणूक लढवू शकतात, अशी बातमी आहे. पाकिस्तानमध्ये फेब्रुवारी 2024 मध्ये सार्वत्रिक निवडणुका होणार आहेत. पाकिस्तान निवडणूक आयोग जानेवारीत उमेदवारांची यादी जाहीर करणार आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com