Guinea Landfill Collapse: पहाटेची झोप ठरली अखेरची! कचऱ्याचा ढिगारा कोसळल्याने 22 जणांचा मृत्यू; गिनी देशातील काळीज पिळवटून टाकणारी घटना

Landslide at Guinea Landfill: गिनी देशाची राजधानी कोनाक्री येथे झालेल्या मुसळधार पावसानंतर एका मोठ्या कचरा डेपोतील कचऱ्याचा प्रचंड ढिगारा कोसळल्याने 22 जणांचा मृत्यू झाला.
Landslide at Guinea Landfill
Guinea Landfill CollapseDainik Gomantak
Published on
Updated on

Landslide at Guinea Landfill: गिनी देशाची राजधानी कोनाक्री येथे झालेल्या मुसळधार पावसानंतर एका कचरा डेपोतील भलामोठा कचऱ्याचा ढिगारा कोसळल्याने 22 जणांचा मृत्यू झाला. ही घटना रविवारी पहाटे 3 वाजण्याच्या सुमारास बस्सिया जिल्ह्यातील दार-एस-सलाम परिसरात घडली. हा ढिगारा कोसळल्याने जवळची मातीची घरे त्यात गाडली गेली आणि लोक ढिगाऱ्याखाली अडकले. मिळालेल्या माहितीनुसार, सहा जण गंभीर जखमी झाले, परंतु नंतर त्यांची सुटका करण्यात आली.

स्थानिक प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, बचाव पथकांनी घटनास्थळावरुन अनेक मृतदेह बाहेर काढून पोस्टमार्टमसाठी पाठवले आहेत. घटनास्थळी लष्कराची बटालियन आणि आपत्कालीन व्यवस्थापन पथकांकडून अहोरात्र शोध व बचाव कार्य सुरु आहे. प्रभावित भागात अजूनही काही लोक ढिगाऱ्याखाली दबले असण्याची शक्यता असल्याने मृतांचा आकडा आणखी वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. देशाच्या प्रादेशिक प्रशासन मंत्री जेनाबू टुरे यांनी दुर्घटनाग्रस्त भागाची पाहणी करुन परिस्थितीचा आढावा घेतला असून संपूर्ण बचाव कार्य पूर्ण झाल्यानंतरच अधिकृत जीवितहानीची आकडेवारी जाहीर केली जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.

Landslide at Guinea Landfill
Papua New Guinea Earthquake: पापुआ न्यू गिनी पुन्हा भुकंपाने हादरले, रिश्टल स्केलवर 5.6 एवढी तीव्रती

विशेष म्हणजे, ज्या लँडफिलवर ही दुर्घटना घडली ते ठिकाण सुरक्षेच्या कारणास्तव बंद केले जाणार होते. पावसाळ्यात अशा कचऱ्याचे ढिगारे खचण्याचा मोठा धोका असतो, त्यामुळे प्रशासनाने आधीच तेथील स्थानिक रहिवाशांना तो परिसर खाली करण्याचे निर्देश दिले होते. मात्र दुर्दैवाने नागरिकांचे स्थलांतर पूर्ण होण्याआधीच हा अपघात (Acident) घडला. या घटनेमुळे कचरा व्यवस्थापन आणि लँडफिल शेजारी राहणाऱ्या नागरिकांच्या सुरक्षेचा गंभीर प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com