तालिबानने (Taliban) अफगाणिस्तानवर (Afghanistan) कब्जा केल्या पासुन अफगाणिस्तानच्या वेगवेगळ्या शहरांत भयानक पडसाद उमटताना दिसता आहेत. काबुल विमानतळावरील परिस्थिती दाखवणारे वेगवेगळे व्हीडीओ काल समोर आले आहेत. जीव वाचवण्यासाठी मिळेल त्या मार्गाने लोक पळण्याचा प्रयत्न करताना दिसता आहे. यावर जगभरातुन प्रतिक्रीया येत असताना, पाकिस्तानमधील नोबेल पुरस्कार विजेती मलाला युसूफजई आणि ग्रेटा थनबर्ग यांनी देखील या प्रकरणावर आपल्या प्रतिक्रीया दिल्या आहेत.
अफगाणिस्तानमधील परिस्थितीवर बोलताना, मलाला युसुफझाई म्हणाली की, आपल्याला अफगाणिस्तानमधील परिस्थितीबद्दल, विशेषत: महिला आणि मुलींच्या सुरक्षिततेबद्दल खूप चिंता वाटते आहे, जागतिक पातळीवरील नेत्यांनी तातडीने या सर्व प्रकरणावर कारवाई करावी अशी मागणी देखील मललाने सोमवारी केली आहे.
जागतिक पातळीवरील पर्यावरण कार्यकर्ता ग्रेटा थनबर्गने देखील या प्रकरणावर आपली भुमिका व्यक्त केली आहे. अफगाणिस्तान या परिस्थितीमधुन जात असताना जग त्यावर ज्या पद्धतिने शांत राहण्याहची भुमिका घेतय ही चिंतेची बाब असल्याने ग्रेटाने म्हटले आहे. तिथल्या महिला आणि मुलं ज्या परिस्थितीला सामोरं जाता आहेत, त्याचा विचार देखील करु शकत नाही असे म्हणत आपल्या भावना व्यक्त केल्या आहे.
दरम्यान, अफगाणिस्तानची राजधानी काबुलमध्ये अतिरेक्यांनी सध्या मोठ्या प्रमाणात धुडगूस घालण्यास सुरुवात केली असल्याचे पहायला मिळते आहे. शहरातील वेगवेळ्या अस्थापना आणि थेट राष्ट्रपती कार्यालयात देखील तालिबान्यांची विचीत्र वागणुक पहायला मिळते आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.