Google New AI Features
Google Web GuideDainik Goamantak

Google New AI Feature: गुगलचं नवं 'एआय' फीचर लाँच; माहिती शोधणं होणार अधिक अचूक

Google Web Guide: गुगलने अलीकडेच भारतात एक नवीन AI मोड सुरू केला आहे. या AI मोडद्वारे तुम्ही गुगलला थेट प्रश्न विचारू शकता, ऑनलाइन शॉपिंग करू शकता.
Published on

टेक जायंट Google कडून एक जबरदस्त आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) फीचर सादर करण्यात आला आहे. Google च्या या AI फीचरचं नाव 'Web Guide' (वेब गाईड) आहे. हे फीचर कंपनीने आपल्या सर्च इंजिनसाठी सादर केलं आहे. सध्या हे फीचर काही निवडक वापरकर्त्यांसाठीच उपलब्ध करण्यात आलं आहे. हे नवीन AI फीचर वापरकर्त्यांना पूर्वीपेक्षा अधिक अचूक आणि उपयुक्त माहिती मिळवून देईल.

Google च्या या नवीन ‘वेब गाईड’ AI फीचरमुळे कोट्यवधी वापरकर्त्यांना सर्चचा एक नवा अनुभव मिळणार आहे. आता तुम्ही Google वर कुठलाही विषय शोधलात, तर AI त्या विषयाची समजूत काढेल आणि त्या संबंधित वेबसाइट्स व लिंक्सना गटांमध्ये विभागून सादर करेल. याचा एक मोठा फायदा असा की, हवी असलेली माहिती शोधणं खूपच सोपं होईल.

Google New AI Features
Google Maps Mishap: गुगल मॅपने दाखवला शॉर्टकट,कार गेली चर्चच्या पायऱ्यांवर; तेलंगणाच्या पर्यटकाचा 'अजब' पराक्रम

Google च्या म्हणण्यानुसार हे नवीन वेब गाईड AI फीचर Gemini मॉडेलचा वापर करतं. हे फीचर विचारलेल्या प्रश्नाचं नीट विश्लेषण करतं आणि त्याचे परिणाम वेगवेगळ्या गटांमध्ये विभागून दाखवतं. प्रत्येक गटात एक शीर्षक, एक संक्षिप्त सारांश आणि त्या विषयाशी संबंधित अनेक लिंक दिलेल्या असतात. जर वापरकर्त्यांना हे फीचर नको असेल, तर ते ‘Standard Web’ पर्यायावर क्लिक करून जुन्यासारखं सर्च अनुभव घेऊ शकतात.

Google New AI Features
Google Maps Mishap: गुगल मॅपने दाखवला शॉर्टकट,कार गेली चर्चच्या पायऱ्यांवर; तेलंगणाच्या पर्यटकाचा 'अजब' पराक्रम

गुगलने भारतात सुरू केला AI मोड

हेही लक्षात घ्या की गुगलने अलीकडेच भारतात एक नवीन AI मोड सुरू केला आहे. या AI मोडद्वारे तुम्ही गुगलला थेट प्रश्न विचारू शकता, ऑनलाइन शॉपिंग करू शकता आणि कोणत्याही विषयाची रिअल टाइम माहिती मिळवू शकता. हे फीचर वापरकर्त्यांना कमी वेळात अधिक अचूक माहिती उपलब्ध करून देतं. याच्या मदतीने वेगवेगळ्या लिंक्सवर क्लिक करण्याची गरज राहत नाही. ‘Web Guide’ आणि ‘AI मोड’ हे दोन्ही फीचर्स कोट्यवधी टेक वापरकर्त्यांना तंत्रज्ञानाचा एक नविन अनुभव देणार आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com