जयशंकर यांच्या फिलीपाइन्स दौऱ्यावरुन चवताळला चीन; ग्लोबल टाइम्सने लिहिले, ''आम्ही सीमा विवादाबाबत...''

S Jaishankar Philippines Visit: परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी अलीकडेच 23 ते 27 मार्च दरम्यान सिंगापूर, फिलीपिन्स आणि मलेशिया या पाच दिवसीय दौऱ्याची सांगता केली.
India Foreign Minister S Jaishankar
India Foreign Minister S JaishankarDainik Gomantak
Published on
Updated on

S Jaishankar Philippines Visit: परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी अलीकडेच 23 ते 27 मार्च दरम्यान सिंगापूर, फिलीपिन्स आणि मलेशिया या पाच दिवसीय दौऱ्याची सांगता केली. यापैकी सर्वाधिक चर्चेचा विषय ठरला तो त्यांचा फिलीपाइन्स दौरा. या दौऱ्यादरम्यान जयशंकर यांनी फिलिपाइन्सचे अध्यक्ष बोनाबोंग मार्कोस यांची भेट घेतली. बैठकीदरम्यानच भारताने दक्षिण चीन समुद्रात फिलीपाइन्सच्या सार्वभौमत्वाचे उघडपणे समर्थन केले.

भारताच्या या पाठिंब्याचा सर्वात मोठा फटका चीनला बसला. चीनी तटरक्षक दल दररोज फिलिपिनो बोटींना त्रास देत आहे. अशा स्थितीत चीनने भारताच्या फिलिपाइन्ससोबतच्या वाढत्या जवळकीतेवरुन गरळ ओकली आहे. चीनच्या सरकारी माध्यमाने लिहिले की, भारताने काहीही केले तरी आम्ही सीमा विवादाबाबत आमच्या भूभागाच्या रक्षणासाठी सदैव तयार आहोत.

ग्लोबल टाइम्सने भारताबद्दल काय लिहिले?

चीनी कम्युनिस्ट पक्षाचे मुखपत्र मानल्या जाणाऱ्या ग्लोबल टाइम्सने लिहिले की, "जयशंकर यांचा सिंगापूर, फिलीपाइन्स आणि मलेशियाचा दौरा विविध कारणांमुळे भारताच्या आसियान देशांसोबतच्या वाढत्या संबंधाचा परिपाक आहे. जयशंकर यांचा दौरा निव्वळ राजनैतिक हेतूने प्रेरित होता. भारत फिलीपाइन्सशी संबंध विकसित करण्याबद्दल उत्साहित नाही.''

India Foreign Minister S Jaishankar
S Jaishankar: ''गाझामध्ये जे काही चाललयं ते चिंताजनक, पण...''; इस्रायल-हमास युद्धावर UN मध्ये जयशंकर स्पष्टच बोलले

ग्लोबल टाइम्सने लिहिले की, "या आठवड्यात मनिला येथे फिलीपान्सच्या परराष्ट्रमंत्र्यांची भेट घेतल्यानंतर, जयशंकर यांनी "नियम-आधारित आदेशाचे दृढ पालन" करण्याचे आवाहन केले आणि "फिलीपिन्सचे सार्वभौमत्व राखण्यासाठी भारताचा पाठिंबा व्यक्त केला. जयशंकर यांचे हे वक्तव्य म्हणजे फिलीपाइन्सला कोरडा आधार देण्यासारखे आहे. शेजारील देशांशी नियमाधारित आदेशाचे पालन करण्यात भारत फार कमी रस दाखवतो.''

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com