Covid-19 Vaccine Side Effects: कोरोना महामारीने जगभर हाहाकार माजवला होता. सुमारे 70 लाख लोकांना आपला जीव गमवावा लागला. या महामारीपासून वाचण्यासाठी लोकांनी लसीकरण केले. आता लसीकरणाचे दुष्परिणाम समोर येत आहेत. लोकांच्या पाठीच्या कण्याला सूज येत आहे. याशिवाय, मज्जासंस्थेचे विकारही दिसून येत आहेत. एका अभ्यासात ही बाब समोर आली आहे.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, ग्लोबल व्हॅक्सिन डेटा नेटवर्कने हा अभ्यास केला आहे. कोरोना महामारीनंतर ब्रेन, ब्लड आणि हार्टवर विपरित परिणाम झाल्याचे या अभ्यासातून समोर आले आहे. अभ्यासात, संशोधकांनी ॲस्ट्राझेनेका लसीशी संबंधित नवीन दुष्परिणाम शोधून काढले आहेत. साइड इफेक्ट्समध्ये एन्सेफॅलोमायलिटिस आणि ट्रान्सव्हर्स मायलाइटिस यांचा समावेश होतो.
दरम्यान, हा अभ्यास ऑस्ट्रेलियामध्ये (Australia) ग्लोबल व्हॅक्सिन डेटा नेटवर्कने केला आहे. या कालावधीत, 6.8 दशलक्ष म्हणजेच 60 लाखांहून अधिक लोकांचा समावेश होता ज्यांना ॲस्ट्राझेनेका लस मिळाली होती. तपासणीनंतर, एन्सेफॅलोमायलिटिस आणि ट्रान्सव्हर्स मायलाइटिस हे लोकांमध्ये दुष्परिणाम म्हणून पाहिले गेले.
ग्लोबल व्हॅक्सिन डेटा नेटवर्कचे सह-संचालक प्रोफेसर जिम बटरी यांच्या म्हणण्यानुसार, लसीचा व्यापक वापर केल्यानंतरच दुष्परिणाम दिसून आले आहेत. ते म्हणाले की, कोरोना संसर्गानंतर मायोकार्डिटिसचा धोका लसीकरणानंतर (Vaccination) जास्त असतो.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.